IPL 2023 – आयपीएल लीगचा झाला मध्यांतर; जाणून घ्या तुमचा आवडता संघ आहे कितव्या क्रमांकावर!

एमपीसी न्यूज – आयपीएल लीगचे 70 पैकी 35 सामने 25 एप्रिल रोजी (IPL 2023) झाले. आयपीएल 2023 हे आता मध्यांतरापर्यंत पोहोचले आहे. तर, आता बऱ्यापैकी प्रत्येक संघाचा आपल्याला अंदाज व ते संघ कुठल्या दिशेने जात आहेत? हे दिसून येत आहे. प्रत्येक संघाने स्वतःचे 14 पैकी कमीत कमी 7 सामने खेळले आहेत. तर, या निमित्ताने  पाहूया कोणते संघ कोणत्या स्थानावर आहेत? आणि ते कसे चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.


दहावे स्थान – दिल्ली कॅपिटल्स (DC)

दिल्ली कॅपिटल्सने 7 सामन्यांपैकी फक्त 2 सामने जिंकून 5 सामान्यांमध्ये पराजय स्वीकारला आहे. कर्णधार रिषभ पंत अपघातात झालेल्या दुखापतीमुळे बाहेर आहे. त्याच्या नेतृत्वाची खंत हि नक्कीच दिल्ली कॅपिटल्सना जाणवत आहे. त्यांच्या फलंदाजीवर गोलंदाजी क्षेत्रात अडचणी दिसून येत आहेत. दिल्लीचे नेट रनरेट -0.961  एवढे खाली आहे.


नववे स्थान – सनरायसर्स हैद्रबाद (SRH) –

सनरायसर्स हैदराबादनेहि दिल्ली कॅपिटल्स प्रमाणे स्वतःचे 7 पैकी फक्त 2  सामने जिंकले असून 5 मध्ये पराभव स्वीकारला आहे. हैदराबादने डेव्हिड वॉर्नरला जाऊ दिल्यापासून त्यांच्याकडे चांगले नेतृत्व व जबाबदारी घेऊन खेळणारा खेळाडू नसल्याचे दिसून येत आहे. हैदराबादकडचे फलंदाज व गोलंदाज हे फार विसंगत कामगिरी (IPL 2023) करत आहेत. त्यांचे नेट रनरेट हे -0.725 असे आहे.


आठवे स्थान – कोलकाता नाईट रायडर्स (KKR) –

कोलकाता नाईट रायडर्स यांनी देखील स्वतःच्या 7 सामन्यांमध्ये फक्त दोन वेळा विजय मिळवून 5 पराभव स्वीकारले आहेत. कोलकाता नाईट रायडर्सकडेसुद्धा त्यांचा आयपीएल सुरु होण्यापूर्वीचा मूळ कर्णधार श्रेयस अय्यर हा दुखापतीमुळे बाहेर आहे. खालच्या तिन्ही संघाना दुखापतींचे फटके जबरदस्त बसलेले दिसत आहेत. कोलकाताच्या नेट रनरेट हे -0.186 असे आहे.

Jalyukta Shivar : महाराष्ट्राची जलयुक्त शिवार योजना देशात अव्वल


सातवे स्थान – मुंबई इंडियन्स (MI) –

आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स हा या वर्षी ढेपाळलेला दिसत आहे. मुंबईने स्वतःच्या 7 सामन्यांमध्ये फक्त 3 सामने जिंकले आहेत व 4 सामने हरले आहेत. संघाचा कर्णधार रोहित शर्मा व इतर वेळेचे त्यांचे महत्त्वाचे खेळाडू विसंगत कामगिरींमुळे मुंबईचीही दशा आहे. त्यावरून स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह याला झालेल्या दुखापतीमुळे मुंबईकडे जॉफ्रे आर्चर सोडून विश्वसनीय गोलंदाज नाही आहे. मुंबईचे रनरेट हे -0.620 आहे.


सहावे स्थान – पंजाब किंग्स (PBKS) –

पंजाब किंग्सची सुरुवात ही खराब झाली आहे असे म्हणता येणार नाही. त्यांनी स्वतःच्या 7 सामन्यांपैकी 4 सामने जिंकून स्वतःची जिंकण्याची टक्केवारी ही 50 % टक्क्यांपेक्षा अधिक ठेवली आहे. खेळाडू कमी कामगिरी करत असले, तरी मोक्याच्या क्षणी निर्णय घेण्याची क्षमता कमी पडत आहे. त्यावरून गेल्या काही सामन्यांमध्ये कर्णधार शिखर धवन हा दुखापतीमुळे बाहेर असल्याने त्याचा थोडा फटका बसला आहे. पंजाबचे नेट रनरेट हे -0.620 आहे.


पाचवे स्थान – रॉयल चाललेंजर्स बेंगळुरू (RCB) –

आरसीबीने स्वतःचे 7 पैकी 4 सामने जिंकून संतुलित सुरुवात केली आहे. आरसीबीचे सलामीवीर फलंदाज कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि विराट कोहली यांचा खांद्यावर बेंगळुरूची फलंदाजीची जबाबदारी घेतली आहे. गोलंदाजी (IPL 2023) आणि मधल्या फलकातले फलंदाजसुद्धा बरी कामगिरी करत आहेत. आरसीबीचे नेट रनरेट – 0.008 आहे.


चौथे स्थान – लखनौ सुपर जायंट्स (LSG) –

बेंगळुरू आणि पंजाबप्रमाणेच लखनौनेसुद्धा 7 पैकी 4 सामने जिंकले आहेत. के. एल. राहुलच्या नेतृत्वाखाली एलएसजीचा संघ सलग दुसऱ्या वर्षी चांगली कामगिरी करत आहेत. आत्तासुद्धा ते प्ले ऑफ ला पात्र ठरण्यासाठी लागणाऱ्या टॉप 4 मध्ये आहेत. मामला फक्त नेट रनरेटचा नसून एलएसजीच्या खेळाडूंनी संघ मोक्याचा वेळी बरोबर निर्णय घेतले आहेत. एलएससीजीचे नेट रनरेट हे +0.547 आहे.


तिसरे स्थान – राजस्थान रॉयल्स (RR) –

राजस्थानच्या जरी एलएसजी, आरसीबी किंवा पंजाब एवढेच सामने जिंकले असले तरी त्यांचा संघाची निर्णय घेण्याबाबत प्रक्रिया अत्यंत सुरेख आहे. युवा कर्णधार संजू सॅम्सन याचा नेतृत्वाखाली राजस्थानने या वर्षी मोठ्या सामन्यांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. बऱ्यापैकी फलंदाज आणि गोलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. राजस्थान रॉयल्सचे नेट रनरेट हे +0.844 आहे.


दुसरे स्थान – गुजरात टायटन्स (GT) –

गुजराती टायटन्सने स्वतःचंही 7 पैकी 5 सामने जिंकले आहेत. मागील वर्षीप्रमाणेच यावर्षीही त्यांची कामगिरीही सुरेख चालू आहे. हार्दिक पंड्या याच्या नेतृत्वाखाली गुजरातने बरेच सामने निवांतपणे जिंकलेले आहेत. शुभमन गिल, रशीद खान, मोहम्मद शमी आदी खेळाडूंमुळे ते कुठल्याही विभागात दुर्मिळ दिसत नाहीत. त्यांचे नेट रनरेट हे +0.580 आहे.


पहिले स्थान – चेन्नई सुपर किंग्स (CSK) –

महान कर्णधार महेंद्र सिंग धोनी याच्या नेतृत्वाखाली चेन्नईने 7 पैकी 5 सामने जिंकून उत्तम नेट रनरेटमुळे ते पॉईंट्स टेबलच्या शिखरावर आहेत. चेन्नईची सुरुवात ही डगमगती झाली होती. परंतु, आकाश सिंग, अजिंक्य राहणे यांनी मिळालेल्या संधीचे सोने केले आहे. देवान कॉन्व्हे याचा फॉर्म परत आला आहे आणि तुषार देशपांडे याच्या शिस्तबद्ध गोलंदाजीमुळे चेन्नई सध्या कुठेच दुर्मिळ दिसत नाही. त्यावरून ऋतुराज गायकवाड, आंबटी रायुडू, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मोईन अली आदी खेळाडूंची उत्तम कामगिरी होत असल्याने चेन्नईचे नेट रनरेट हे +0.662 आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.