Pune : मधुमेह आणि उच्च रक्तदाबाची औषधं नागरिकांना मोफत देण्याचा पुणे महापालिकेचा निर्णय

एमपीसी न्यूज :  मागील काही वर्षापासून मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या (Pune) रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. बदलत जाणारी लाईफस्टाईल आणि कोरोना संसर्गानंतर तरुणांमध्ये मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळेच पुणे पालिकेकडून मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या नागरिकांना मोफत औषध मिळणार आहेत. 

पुण्यात उच्च रक्तदाब आणि मधुमेह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पुणे महापालिकेला राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांर्तगत 43 लाखांचा निधी मिळाला आहे. पालिकेच्या सर्व दवाखान्यात उच्च रक्तदाब आणि मधुमेहाची मोफत जेनेरिक औषधी देण्याचा निर्णय घेतला आहे. 30 पेक्षा जास्त वय असलेल्या लोकांमध्ये 25% लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास तसेच 12% लोकांना मधुमेहाचा त्रास असल्याचे दिसून आलं आहे. पालिकेच्या वैद्यकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी कार्डची गरज असते मात्र या औषधांसाठी कार्डची गरज लागणार नाही आहे. सगळ्या पालिकेच्या दवाखान्यांमध्ये मोफत औषधे मिळणार आहे. ही औषधी मिळविण्यासाठी उच्च रक्तदाब आणि मधुमेहाच्या रक्त तपासणीचा अहवाल लागणार आहे.

YCMH : ‘ऑन ड्युटी’ योग प्रशिक्षण भोवले; डॉक्टरसह 8 जणांवर दंडात्मक कारवाई

पुणे महानगरपालिका यावर्षीपासून मधुमेह आणि उच्च रक्तदाबावरील जेनेरिक औषधे मनपाच्या रूग्णालयांमध्ये उपलब्ध करून देणार आहेत. (Pune) त्यामध्ये शुगर आणि बीपीसाठी 6 प्रकारची औषधे असणार आहेत. यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीला पाठविला आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.