YCMH : ‘ऑन ड्युटी’ योग प्रशिक्षण भोवले; डॉक्टरसह 8 जणांवर दंडात्मक कारवाई

एमपीसी न्यूज –  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील डॉक्टरसह कर्मचा-यांना कार्यालयीन वेळेत योग विषयक प्रशिक्षण घेणे चांगलेच भोवले आहे.(YCMH) आयुक्त शेखर सिंह यांनी या कर्मचा-यांवर जबरी दंडात्मक कारवाई केली. त्यांच्या वेतनातून दंड वसुल करण्याचे आदेश दिले आहेत.

वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा जावळे, नर्स सविता ढोकले, नुतन मोरे, निलिमा झगडे, लिपिक प्रतिभा मुनावत, सुषमा जाधव, सहाय्यक भांडारपाल कविता बहोत, शिपाई शमलता तारु यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. वायसीएम रुग्णालयातील काही अधिकारी व कर्मचारी कोणतीही परवानगी न घेता ऑक्टोबर 2022 पासून दररोज दुपारी 3 ते 4.30 या वेळेत योग विषयक प्रशिक्षण घेत असल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या पथकाने 29 नोव्हेंबर 2022 रोजी केलेल्या तपासणीमध्ये आढळून आले.

वायसीएम रुग्णालाय पंचक्रोशीतील, महापालिकी हद्दीबाहेरील रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवाणारी एक महत्वाचे व अत्यावश्यक रुग्णालय आहे. त्यानुसार रुग्णालय प्रशासनातील सर्व अधिकारी, कर्मचा-यांनी सचोटीने वागून नेमून दिलेले कामकाज पूर्ण करणे, रुग्णांना तातडीने सेवा देणे ही त्यांची प्रथम जबाबदारी व कर्तव्ये आहे.(YCMH) असे असताना रुग्णालयातील काही अधिकारी, कर्मचा-यांनी कार्यालयीन वेळेत योग प्रशिक्षणास उपस्थित राहून कर्तव्यात कसूर केले. ही बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असून रुग्णालयीन सेवेमध्ये अडथळा निर्माण करणारी आहे.

Pune : कोणताही प्रकल्प राबवताना प्रशासनाने लोकांना विश्वासात घेतले पाहिजे – सयाजी शिंदे

त्यामुळे याबाबत वायसीएमचे डीन डॉ. राजेंद्र वाबळे यांच्याकडून खुलासा मागविला होता. कार्यालयीन वेळेत योग प्रशिक्षणास कोणतीही लेखी परवानगी दिली नसल्याचे त्यांनी कळविले. त्यानंतर या अधिकारी, कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटीस बजाविली. त्यांनी सादर केलेले खुलासे संयुक्तिक नाहीत. कार्यालयीन वेळेत योग प्रशिक्षण वर्गास उपस्थित राहून गंभीर स्वरुपाचे गैरवर्तन केले. रुग्णालयातील सेवेत अडथळा निर्माण केला.

त्यामुळे आयुक्त सिंह यांनी दंडात्मक कारवाईचा आदेश दिला.  त्यानुसार डॉ. जावळे यांच्यावर 53 हजार 356, मुनावत 22 हजार 32, जाधव 10 हजार 432, बहोत 11 हजार 904 आणि तारु यांच्यावर 11 हजार 896 रुपये दंडाची कारवाईची केली. त्यांच्या वेतनातून ही रक्कम वसूल केली जाणार आहे. (YCMH) तर, विनापरवाना योग प्रशिक्षणास उपस्थित राहणा-या नर्स ढोकले, मोरे, झगडे यांना 200 रुपये दंड लावला आहे. यापुढे अशा स्वरुपाचे गैरवर्तन अथवा कर्तव्यात कसूर केल्यास यापेक्षा कडक शास्ती कारवाईचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.