Vadgaon : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधारा, पंप हाऊसची उपनगराध्यक्षांनी केली पाहणी

एमपीसी न्यूज – वडगाव शहराला (Vadgaon) इंद्रायणी नदीवरील जांभूळ, सांगवी, कातवी या ठिकाणी असलेले मुख्य बंधारे, जॅकवेल व पंप हाऊसमधून पाणी पुरवठा केला जातो. उपनगराध्यक्षा व पाणी पुरवठा सभापती सायली रुपेश म्हाळसकर यांनी आज (बुधवारी, दि. 26) त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.

सध्या सर्वत्र उन्हाचा कडाका वाढत असताना नदीपात्रातील पाण्याची पातळी हळू-हळू कमी होऊ लागली आहे या अनुषंगाने वडगाव शहरातील नागरिकांना स्वच्छ व सुरळीत पाणी पुरवठा करत असलेल्या इंद्रायणी नदीवरील जांभूळ,सांगवी,कातवी या ठिकाणी असलेले मुख्य बंधारे, जॅकवेल व पंप हाऊसची उपनगराध्यक्षा व पाणी पुरवठा सभापती सायली रुपेश म्हाळसकर यांनी आज थेट त्या ठिकाणी जाऊन पाहणी केली व तेथील पाणी साठ्याची परिस्थिती जाणून घेतली.

YCMH : ‘ऑन ड्युटी’ योग प्रशिक्षण भोवले; डॉक्टरसह 8 जणांवर दंडात्मक कारवाई

यावेळी वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा,ना दुरुस्त (Vadgaon) झालेले विधुत रोहित्र,पाणी पंप तसेच अपुऱ्या व आवश्यक असणाऱ्या सुविधां नोंदवून घेण्यात आल्या. या प्रसंगी पाणीपुरवठा विभाग अभियंता ताराचंद नेमाडे, विकास साबळे व कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.