Jalyukta Shivar : महाराष्ट्राची जलयुक्त शिवार योजना देशात अव्वल

एमपीसी न्यूज : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने जाहीर केलेल्या भारतातल्या जलाशयांच्या जनगणनेत महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Jalyukta Shivar) राबविलेली जलयुक्त शिवार योजना देशात अव्वल ठरली आहे. देशभरातल्या सिंचनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यासपूर्वक दूरदृष्टीने राबविलेल्या या योजनेस संपूर्ण देशाची आता अधिमान्यता मिळाली आहे. 

जल संवर्धन योजनांच्या बाबतीत महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला असून केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या पहिल्या गणनेचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालातूनच जलयुक्त शिवार योजनेचे यश अधोरेखित झाले आहे.

YCMH : ‘ऑन ड्युटी’ योग प्रशिक्षण भोवले; डॉक्टरसह 8 जणांवर दंडात्मक कारवाई

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार योजना सुरू केली होती मात्र 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांना बाजूला सारून उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीशी हात मिळवणी करून महाविकास आघाडीचे सरकार तयार केल्यानंतर या जलयुक्त शिवार योजनेस त्या सरकारने नख लावले ती योजना स्थगित केली होती. (Jalyukta Shivar) मात्र आता ठाकरे पवार सरकार जाऊन शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा फडणवीसांच्या दूरदृष्टीतली जलयुक्त शिवार योजना सरकारने पुन्हा राबवायला सुरुवात केली असून याच जलयुक्त शिवार योजनेस देशात अव्वल क्रमांक मिळाला आहे. जलयुक्त शिवारामुळे महाराष्ट्राला जलसंवर्धनात प्रथम क्रमांकावर आला.

जलयुक्त शिवार अभियान

या योजनेमुळे दुष्काळग्रस्त 18 हजार गावांचा पाण्याचा प्रश्न सुटला.

मराठवाड्यात भूजल पातळी सरासरी 3 मीटर ने वाढली भूजल तज्ञांचा रिपोर्ट.

शेतकरी दुहेरी पिके घेऊ लागला.

शेतकऱ्यांच उत्त्पन्न वाढले.

जनावरांना 12 महिने चारा मिळू लागला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.