Alandi: गावठाण विभागात अखेर तीन दिवसानंतर पाणी ;भामा आसखेड चे पाणी मिळून सुद्धा आळंदीतील पाण्याची समस्या कायम

एमपीसी न्यूज- गुरुवार दि. 4 रोजी पुणे महानरपालिकेने नियमित देखभाल (Alandi) दुरुस्तीकरिता एक दिवसाकरिता पाणीपुरवठा बंद घोषित केला होता. त्यामुळे पुणे शहरासह आळंदी शहराचा (भामा आसखेड येथील)पाणीपुरवठा बंद राहिला होता.त्याच्या परिणाम आळंदी शहरातील पाणी पुरवठ्यावर दिसून आला. सलग तीन दिवस आळंदी गावठाण (खेड विभाग) विभागात पाणी नसल्याने लोकांची मोठी तारांबळ उडाली.

घरातील विविध वापरा करिता पाणी उरले नसल्याने नागरिक विकतचे (Alandi)पाण्याचे टँकर तसेच जवळपास च्या कूपनलिकेतून पाणी वापरा करिता पाणी घेताना दिसत होते.
रात्री 12.30 नंतर भामा आसखेड वरून पाणीपुरवठा करण्यात आल्याने व पाण्याचा दाब कमी असल्याने पाण्याच्या टाक्या भरण्यास वेळ लागला. त्यामुळे आज दिनांक 5 रोजी गावठाणात दुपारी सुमारे बारा सव्वा बाराच्या दरम्यान पाणीपुरवठा सुरु झाला.

सद्यस्थितीत आळंदी शहरातील नागरिकांना दोन दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे.पुणे महानरपालिकेने नियमित देखभाल दुरुस्तीकरिता एक दिवसाकरिता पाणीपुरवठा बंद घोषित केला केल्याने आळंदी शहरातील पाणी पुरवठ्यावर परिणाम दिसून आला.

आळंदी मध्ये पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून ह्या गैरसोयीचा आळंदीकराना कायम सामना करावा लागेल असे दिसत आहे.आळंदीच्या पंपिंग हाऊस मध्ये शहराला एक दिवस पुरेल एवढा पाणी साठा करण्याची साठवण क्षमता आहे काय? असेल तर मग पाणी साठवले का गेले नाही? असे सवाल सोशल मीडियाच्या माध्यमातून होत आहे. तसेच जुने शुद्धीकरण केंद्र बंद असून त्याचा पाणी नियोजनासाठी पुनर्वापर होऊ शकतो का? अशी चर्चा सुद्धा शहरात चालू असते.

शहरातील दिवसाआड पाणी पुरवठ्यास सव्वा चार वर्षे पूर्ण:-

इंद्रायणी काठच्या गावातील मैलामिश्रित व रासायनिक मिश्रित पाणी या मुळे इंद्रायणी नदीच्या प्रदूषणात प्रचंड वाढी झाली. आळंदी येथील जलशुद्धीकरण केंद्रात हे प्रदूषित पाणी शुद्ध करताना जास्त वेळ जात होता.

Don Arun Gawli : डॉन अरुण गवळीची होणार मुदतपूर्व सुटका

शहरातील टाक्या भरण्यास विलंब होत होता.व संपूर्ण आळंदी शहरात पाणीपुरवठा करण्यास ताण निर्माण होता.याचा उपाय म्हणून दि.31 डिसेंबर 2019 रोजी आळंदीचे तत्कालीन मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी आळंदीत खेड विभाग व हवेली विभाग असे झोन करत दिवसा आड पाणी पुरवठा सुरू केला. त्याला सव्वा 4 वर्ष पूर्ण झाले आहेत.

आळंदी शहरास दिवसा आड पाणी पुरवठा होत होता. भामा आसखेड पाणी नियोजन साठ्या नुसार तो या फेब्रुवारी महिना अखेर दोन दिवसा नंतर करण्यात आला. सद्यस्थितीत आळंदीतील नागरिकांना दोन दिवसांनी पाणी मिळत आहे. काही दुरुस्ती चे काम निघाल्यास ती दुरुस्ती झाल्या नंतरच शहरात पाणी पुरवठा होत आहे.

भामा आसखेड येथील पाणी मिळून सुद्धा आळंदी शहरातील नागरिकांची पाण्याची समस्या कायम आहे.पाणी पुरवठ्याबाबत योग्य ती उपाय योजना करून ती समस्या सोडविण्याचे प्रयत्न पुढे भविष्यात होऊन शहरात सर्वत्र रोज पाणीपुरवठा व्हावा असे नागरिक इच्छा व्यक्त करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.