Don Arun Gawli : डॉन अरुण गवळीची होणार मुदतपूर्व सुटका

एमपीसी न्यूज – मुंबईचे नगरसेवक कमलाकर जमसंडेकर यांच्या हत्या(Don Arun Gawli ) प्रकरणात अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी सध्या नागपूर कारागृहात आहे. मात्र सन 2006च्या शासन निर्णयाच्या आधारे अरुण गवळीची कारागृहातून सुटका होणार आहे. याबाबत नागपूर खंडपीठाने आदेश दिले आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अरुण गवळीच्या सुटकेची घटना अनेकांच्या भुवया उंचावणारी आहे.

नगरसेवक कमलाकर जामसांडेकर हत्या प्रकरण

अरुण गवळीने अखिल भारतीय सेना नावाचा पक्ष सुरु केला. त्या पक्षाकडून (Don Arun Gawli )तो आमदार म्हणून निवडून आला. सन 2007 च्या महापालिका निवडणुकीत डॅडी म्हणजेच अरुण गवळीने मोहिली गाव एल वॉर्ड मधून अजित राणे हा उमेदवार दिला होता.

Pune: पोलीस कर्मचाऱ्याची स्वतःवर गोळ्या झाडत पोलीस चौकीतच आत्महत्या

त्याच्या विरोधात शिवसेनेने कमलाकर जमसंडेकर यांना उमेदवारी दिली. जमसंडेकर यांनी राणेचा पराभव केला. हा पराभर डॅडीच्या जिव्हारी लागला. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर महिनाभरानंतर २ मार्च रोजी जमसंडेकर यांची हत्या झाली. ते त्यांच्या घरात बसले असताना दोघांनी घरात घुसून त्यांची हत्या केली.

जमसंडेकरांची 30 लाखांची सुपारी निघाली

हत्या प्रकरणात साहेबराव भिंताडे आणि बाळू सुर्वे हे मास्टरमाईंड होते. भिंताडे हे कमलाकर जमसंडेकर यांचे राजकीय गुरू होते. परंतु, राजकारण आणि काही प्रॉपर्टीसंबंधी जमसंडेकर यांचे भिंताडे आणि बाळु सुर्वे यांच्यात वाद झाले होते. त्यामुळे त्याचा राग दोघांच्या डोक्यात होता. दोघांनी जमसंडेकर यांच्या हत्येची 30 लाखांची सुपारी अरुण गवळीला दिली. ही सुपारी अरुण गवळीने प्रताप गोडसेला दिला. गोडसे याने आपले नाव येऊ नये यासाठी नवीन शूटर्स शोधले. श्रीकृष्ण गुरव याच्या मार्फत नरेंद्र गिरी आणि विजयकुमार गिरी या दोघांची निवड झाली. दोघांना अडीच लाख रुपये देण्याचे ठरले. 20 हजार रुपये एडव्हान्स देखील देण्यात आला. विजयकुमार याने अशोककुमार जयस्वाल याला सोबत घेऊन जमसंडेकर यांच्यावर 15 दिवस पाळत ठेवली होती. अखेर जमसंडेकर यांची त्यांच्या घरातू घुसून हत्या करण्यात आली.

गवळीला दोन वेळेला जन्मठेप

अरुण गवळी उर्फ डॅडी याला अटक झाल्यानंतर त्याची नागपूर कारागृहात रवानगी करण्यात आली. नगरसेवक कमलाकर जमसंडेकर हत्या प्रकरण आणि इतर गुन्हेगारी कृत्यांसाठी गवळीला दोन वेळा जन्मठेपेची शिक्षा झाली. सध्या तो नागपूर कारागृहातच आहे.

शासन निर्णयानुसार गवळीची सुटका

सन 2006 साली शासनाने एक निर्णय घेतला; वयाची 65 वर्षे पूर्ण झालेल्या अशक्त तसेच अर्धी शिक्षा भोगलेल्या कैद्याला शिक्षेत सूट मिळेल, असे त्या निर्णयात म्हटले होते. याच निर्णयाचा आधार घेऊन गवळीने शिक्षेतून मुदतपूर्व सुटकेची मागणी केली होती.

 

याबाबत नागपूर खंडपीठात सुनावणी पूर्ण झाली होती. न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. न्यायालयाने अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र त्याबाबत उत्तर देण्यासाठी जेल प्रशासनाला चार आठवड्यांचा अवधी देखील दिला आहे. जेल प्रशासन काय निर्णय घेणार यावर गवळीच्या सुटकेचा मार्ग ठरणार आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.