Pune : कोणताही प्रकल्प राबवताना प्रशासनाने लोकांना विश्वासात घेतले पाहिजे – सयाजी शिंदे

एमपीसी न्यूज – नदी काठ सुधार योजना व बालभारती ते पौंड फाटा प्रस्तावित रस्त्यांसंदर्भात पुणेकर नागरिकांकडून जोरदार विरोध दिसून येतो आहे. या दोन्ही प्रकल्पांची माहिती घेऊन वेताळ टेकडी आणि बंडगार्डेन येथे सह्याद्री देवराईचे संस्थापक व ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे नागरिकांशी संवाद साधला.(Pune) नदी पुनरुज्जीवनाचे सुरु असलेले काम आणि वेताळ टेकडीवरून जाणाऱ्या प्रस्तावित रस्त्याबाबत सयाजी शिंदेनी सर्व माहिती जाणून घेतली.

नागरिकांशी सवांद साधताना सयाजी शिंदे म्हणाले, ” कोणताही प्रकल्प राबवताना प्रशासनाने लोकांना विश्वासात घेतले पाहिजेल.” तसेच त्यांनी अति वृक्ष तोडीमुळे नष्ट होणाऱ्या जैवविविधते बाबत सयाजी शिंदेनी खंत व्यक्त केली. पुण्यातील बंडगार्डेन येथील नदीकाठचे तोडले जाणारे वृक्ष तसेच वेताळ टेकडीचा रास्ता फोडायची चर्चा पुढच्या आठवड्यात महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांचा सोबत होणार आहे असे त्यांनी सांगितले.

PCMC : 24 तासात रुजू व्हा; अन्यथा, आयुक्तांचा ‘या’ दोन सहाय्यक आयुक्तांना इशारा

सयाजी शिंदे यांनी महाराष्ट्रात पर्यावरणाविषयी असणारी चळवळ, वृक्षरोपणाची नवीन पद्धत, प्रशासन व नागरिकांची भूमिका या गोष्टींबाबत वेताळ टेकडी बचाव कृती समितीच्या सदस्यांनी चर्चा केली.(Pune) सदस्यांनी शक्य तेवढी मदत करण्याचे सुद्धा आश्वासन दिले. टेकडी बचाव कृती समितीचे सदस्य प्राजक्ता दिवेकर, सचिन बहिरट, सुषमा दाते, परेश लोढा, अंगद पटवर्धन, अवंती गाडगीळ, हर्षवर्धन रानडे, सागर शिंदे, राजकुमार खोडके आणि शुभम आदी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.