PCMC : 24 तासांत रुजू व्हा; अन्यथा…, आयुक्तांचा ‘या’ दोन सहाय्यक आयुक्तांना इशारा

एमपीसी न्यूज – रजा घेऊन बदलीसाठी प्रयत्नशील (PCMC) असलेले निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर आणि आकाश चिन्ह व परवाना विभागाचे प्रशांत जोशी यांना आयुक्त शेखर सिंह यांनी दणका दिला आहे. 24 तासांत कामावर रुजू व्हावे, अन्यथा शिस्तभंगाच्या कारवाई करण्याचा इशारा नोटिसद्वारे देण्यात आला.

प्रतिनियुक्तीने महापालिकेत आलेले उपजिल्हाधिकारी संवर्गातील सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर, प्रशांत जोशी, ह क्षेत्रीय अधिकारी सुषमा शिंदे आणि भूमी व जिंदगी विभागाचे उपायुक्त सचिन ढोले हे गेल्या काही दिवसांपासून रजेवर गेले आहेत.

महापालिकेतील उपायुक्त, सहाय्यक आयुक्तांच्या 13 एप्रिल रोजी आयुक्त सिंह यांनी बदल्या केल्या आहेत. आपल्याला मनासारखा विभाग मिळाला नाही, त्यामुळे दोन अधिकारी रजेवर (PCMC) आहेत तर खांडेकर, जोशी बदलीच्या मूडमध्ये असल्यामुळे रजेवर गेल्याची चर्चा आहे.

Alandi : आळंदी शहरातील गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार

खांडेकर यांची 13 एप्रिल रोजी तर जोशी यांची 21 एप्रिल रोजी रजा संपली. रजा संपताच दोघांनीही तत्काळ कर्तव्यावर उपस्थित होणे अभिप्रेत व अपेक्षित होते. रजा संपली. तरी, दोघेही कामावर रुजू झाले नाहीत. अनुउस्थितीबाबत कार्यालय, सक्षम प्राधिकारी यांना कोणतीही पूर्वकल्पना दिली नाही.

दोघे अद्यापही कामावर रुजू झाले नाहीत. त्यामुळे कार्यालयीन कामकाजात अडथळा निर्माण होत आहे. या गैरवर्तनाने महाराष्ट्र नागरी सेवा नियमाचे उल्लंघन होत आहे. दोघांनीही नोटीस मिळाल्यापासून 24 तासाच्या आत कर्तव्यावर रुजू व्हावे. रुजू न झाल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा आयुक्त सिंह यांनी नोटिसीद्वारे दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.