Alandi : आळंदी शहरातील गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार

एमपीसी न्यूज : आळंदी शहरास (Alandi) पाणी पुरवठा करणाऱ्या भामा आसखेड जलाशयातील विद्युत पुरवठा तांत्रिक कारणास्तव दि.27 एप्रिल रोजी मध्यरात्री 1 पासून ते (27 एप्रिल) संध्याकाळी 8 वाजेपर्यंत बंद रहाणार आहे.

सदर कालावधीत आळंदी शहरातील हवेली विभागाचा पाणीपुरवठा होणार नाही. भामा आसखेड जलाशयातून दि.28 एप्रिल रोजी पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर हवेली विभागातील टप्पे करण्यात येतील व दि.29 एप्रिल रोजी आळंदी गावठाण विभागातील टप्पे करण्यात येतील.

Pune : भरधाव डंपरची दुचाकीला धडक; निवृत्त पोलीस कर्मचाऱ्यासह पत्नीचा जागीच मृत्यू

पाण्याचा (Alandi) काटकसरीने वापर करून नगर परिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.