IPL: हार्दिक पंड्याची मुंबई इंडियन्स मध्ये वापसी; शुभमन गिल गुजरातचा नवा कर्णधार

एमपीसी न्यूज – रविवारी रिटेंशनच्या दिवशी IPL च्या सर्व फ्रँचायझींनी (IPL)आपल्या संघात कायम ठेवलेल्या आणि सोडलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली. ज्यामध्ये गुजरात टायटन्सने सुरुवातीला हार्दिक पंड्याला कायम ठेवले होते, परंतु काही वेळानंतर मुंबई इंडियन्सने पंड्याचा आपल्या संघात समावेश केला.

 

या पार्श्वभूमीवर आज सोमवारी गुजरात टायटन्सच्या  कर्णधार पदाची सूत्रे शुभमन गिलकडे सोपविल्याची माहिती गुजरात टायटन्स फ्रँचायझीचे संचालक विक्रम सोलंकी यांनी दिली.

भारताचा अष्टपैलू खेळाडू आणि मागील दोन हंगामामध्ये (IPL)गुजरात टायटन्स चे नेतृत्व करणारा हार्दिक पंड्याला मुंबई इंडिअन्स ने परत आपल्या संघात घेतले आहे. हार्दीकला संघात घेण्यासाठी मुंबई इंडिअन्स ने कॅमेरून ग्रीन ला आरसीबी सोबत ट्रेड केले आहे. हार्दिकची एका हंगामाची फी 15 कोटी रुपये आहे. त्याला आपल्या संघात घेण्यासाठी मुंबई ने 17.50 कोटी रुपये फीस असलेल्या कॅमेरून ग्रीनला रॉयल चॅलेंजर बंगलोर ला दिले. त्यामुळे मुंबई कडे आवश्यक रक्कम शिल्लक राहिली. त्यातूनच  हार्दिक पंड्याला मुंबईत घेण्याचा मार्ग सुकर झाला.

Pune : नगर रोडवरील टँकरमधून झालेल्या वायुगळतीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश; मोठा धोका टळला
हार्दिक पंड्या भारताचा अष्टपैलू खेळाडू असून त्याच्या नेतृत्वात गुजरातने 2022 मध्ये पदार्पणातच विजेतेपद मिळवले होते.  त्यानंतर 2023 मध्ये देखील हा संघ त्याच्या नेतृत्वात अंतिम सामन्यात पोहचला होता. यावेळी थोडक्यात गुजरातचे विजेतेपद हुकले. यापूर्वी हार्दिक मुंबई इंडिअन्सच्या संघाकडून खेळला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई इंडिअन्स संघाच्या कर्णधार पदाची सूत्रे रोहित शर्मा कडून हार्दिककडे येतील का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

हार्दीक पंड्या मुंबईच्या संघात गेल्याने गुजरात टायटन्सचा धडाकेबाज युवा फलंदाज शुभमन गिल याच्या गळ्यात गुजरातच्या कर्णधार पदाची माळ पडली आहे. शुभमन गिलच्या आयपीएल कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, या  युवा सलामीवीराने 2018 साली आयपीएलमध्ये पदार्पण केले. केकेआरने 2018 मध्ये त्याचा समावेश केला होता. आयपीएल मधील उत्कृष्ट कामगिरीनंतर गिलने भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. गिलने 2019 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध वनडे पदार्पण केले.

यानंतर त्याने 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले. केकेआरने गिलला 2022 मध्ये सोडले, त्यानंतर गुजरात टायटन्सने त्याला आपल्या संघात घेतले. शुभमन गिलने 2022 च्या आयपीएल हंगामात 16 सामने खेळताना 483 धावा केल्या होत्या, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 96 होती. 2023 मध्ये शुभमन गिलने 17 सामने खेळले आणि एकूण 890 धावा केल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.