Pune : सुमधुर सादरीकरणाने रंगला ‘चित्रस्वर’

एमपीसी न्यूज – सुमधुर बासरीवादनासोबतच मराठी व हिंदी चित्रपटांमधील ( Pune) बंदिशी, चित्रपट गीते, ठुमरी, दादरे यांचे सादरीकरण असलेला ‘चित्रस्वर’ हा कार्यक्रम नुकताच मयूर कॉलनी येथील एम ई एस बालशिक्षण सभागृहात संपन्न झाला. पुण्यातील प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशनच्या वतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात सुप्रसिद्ध बासरीवादक पं मिलिंद दाते यांचे शिष्य अनुराग जोशी यांच्या दमदार बासरीवादनाने झाली. त्यांनी राग किरवानी प्रस्तुत केला. यामध्ये त्यांनी सुरुवातीला पारंपारिक आलाप, जोड, झालाचे सादरीकरण केले. यानंतर द्रुत तीनतालात बंदिश सादर करीत त्यांनी आपल्या सादरीकरणाला विराम दिला. त्यांना ओंकार बोर्डे यांनी तबला साथ केली.

IPL: हार्दिक पंड्याची मुंबई इंडियन्स मध्ये वापसी; शुभमन गिल गुजरातचा नवा कर्णधार

यानंतर प्रेरणा म्युझिक ऑर्गनायझेशनच्या संचालिका पाटणकर यांनी केलेले निवेदन व गायन, अमर ओक यांचे बासरीवादन आणि भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांचे नातू विराज जोशी यांचे गायन यांमुळे कार्यक्रमाचा उत्तरार्ध रंगला. यामध्ये मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये आलेल्या भारतीय शास्त्रीय संगीतातील बंदिशी, चित्रपट गीते, ठुमरी, दादरे यांचे बहारदार सादरीकरण झाले.

या दरम्यान ‘भोर भई…’,  ‘याद पिया की आये…’, ‘का करू सजनी…’, ‘अलबेला साजन आयो…’, ‘मधुबन मे राधिका नाचे…’ यांसोबतच हंसध्वनी रागामधली ‘जा तोसे नही…’, ‘रंगी सारी गुलाबी आहे..’, ‘काहे छेडछेड ही…’, ‘झुठे नैना बोले…’ या रचना राग तोडी, अहिरभैरव, बसंत, पहाडी, बिलास खानी तोडी मध्ये सादर झाल्या. यावेळी प्रसाद जोशी व अभिजीत बारटक्के (तबला), ऋतुराज कोरे (रिदम), मिहिर भडकमकर (कीबोर्ड) यांनी साथसंगत केली.

यानंतर पं. अमरेंद्र धनेश्वर यांनी राग केदार आणि राग काफी रागांमधील काही रचना व भैरवी सादर करीत कार्यक्रमाचा समारोप केला. त्यांना अभिजीत बारटक्के (तबला), आणि प्रज्ञा देसाई (व्हायोलिन) यांनी साथसंगत केली. वेदवती परांजपे, नितीन महाबळेश्वरकर यांनी निवेदन केले.

एमआयटी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ लिबरल आर्टसच्या सह अधिष्ठाता डॉ. प्रीती जोशी, पराग गाडगीळ, लेखक अच्युत गोडबोले, मंजिरी कर्वे आणि अनेक दिग्गज कलाकार यावेळी उपस्थित ( Pune) होते.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.