Today’s Horoscope 28 November 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

एमपीसी न्यूज : आजचे पंचांग – Today’s Horoscope 28 November 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

आजचे पंचांग

आजचा दिवस – मंगळवार.

तारीख – 28.11.2023.

शुभाशुभ विचार – चांगला दिवस. 

आज विशेष – सामान्य दिवस.

राहू काळ – दुपारी 3.00 ते 04.30.

दिशा शूल – उत्तरेस असेल.

आज नक्षत्र – रोहिणी 13.31 पर्यंत नंतर मृग.

चंद्र राशी – वृषभ.

—————————–

मेष – ( शुभ रंग – चंदेरी)

आज तुमची आर्थिक बाजू भक्कम असल्याने मुलांचे हट्ट तुम्ही हौसेने पुरवाल. अनपेक्षित येणाऱ्या पाहुण्यांची उठबस अगत्याने कराल. आज मोजकेच बोलणे प्रभावी राहील.

वृषभ -( शुभ रंग- मोरपंखी)

आज तुम्ही स्वतःच्याच प्रेमात राहाल. कुठेही आपलीच मर्जी चालवण्याचा तुमचा अट्टाहास राहील. तरी महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय अनुभवींच्या सल्ल्यानेच घ्या.

मिथुन – ( शुभ रंग- सोनेरी)

कुटुंबीयांच्या वाढत्या गरजा भागवताना जमाखर्चाची गणिते बिघडतील. गृहिणींना पूर्वीची बचत कामी येईल. कलाकारांचा परदेशी नावलौकिक होईल. आज प्रवास कराल.

कर्क – ( शुभ रंग – पांढरा)

लाभातील चंद्र तुमच्या मनातील एखादी सुप्त इच्छा पूर्ण करेल. मुला-मुलींचे विवाह योग जुळून येतील. आज शुभचिंता म्हणजे शुभच होईल. वाणिज गोडवा असू द्या.

सिंह – ( शुभ रंग – गुलाबी)

मित्रमंडळींना आज दुरूनच रामराम करून आज आपल्या ध्येयप्राप्तीस प्राधान्य द्याल. कार्यक्षेत्रात तुमचे महत्त्व सिद्ध कराल. विरोधकही आज मैत्रीचा हात पुढे करतील.

कन्या – ( शुभ रंग- आकाशी)

महत्त्वाच्या घरगुती प्रश्नात वडीलधाऱ्यांचे मत अवश्य घ्या. आज अति आक्रमकता नुकसानास कारणीभूत होईल. कायद्याची चौकट मोडणे महागात पडू शकते.

तूळ – ( शुभ रंग- भगवा)

नवीन व्यवसायात भागीदारांमध्ये काही तीव्र स्वरूपाचे मतभेद होऊ शकतात. जोडीदाराच्या चुका काढायची चूक आज करू नका. आर्थिक गुंतवणूक सावधपणे करा.

वृश्चिक – ( शुभ रंग – राखाडी)

कुटुंबात आज खेळीमेळीचे वातावरण असेल. आज जोडीदाराचे हट्ट पुरवण्यास तुम्ही प्राधान्य द्याल. व्यवसायात भागीदारांमध्ये सुसंवाद असून योग्य निर्णय घेऊ शकाल.

धनु – (शुभ रंग- केशरी)

नोकरीच्या ठिकाणी आज वरिष्ठ तुमच्या कामातील समर्पणाची दखल घेतील. ज्येष्ठ मंडळींना आज काही आरोग्यविषयक चाचण्या करून घ्याव्या लागतील.

मकर-  (शुभ रंग- स्ट्रॉबेरी)

नोकरदारांना नोकरीत बदल करण्यासाठी उत्तम संधी चालून येतील नवोदित कलाकारांची प्रसिद्धीची हौस भागेल. जीवाची मुंबई करण्यास आज पुरेसा पैसा उपलब्ध होईल.

कुंभ – (शुभ रंग- जांभळा)

स्थावर शेतीवाडी संबंधित रखडलेले व्यवहार मार्गी लागतील. गृह उद्योग करणाऱ्या महिलांना कर्ज मंजुरी होऊ शकते. मुलांकडून पालकांच्या अपेक्षा पूर्ण होतील.

मीन – ( शुभ रंग- लाल)

आज प्रत्यक्ष कृतीपेक्षा रिकामटेकड्या गप्पांमध्ये तुमचा बराच वेळ फुकट जाईल. सामाजिक कार्यकर्ते गरजूंच्या कामे येतील. आज शेजारी आपलेपणाने डोकावतील.

श्री जयंत कुळकर्णी.

ज्योतिष व वास्तु शास्त्र सल्लागार.

फोन – 9689165424.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.