Chakan : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य नितीन गोरे यांच्या मातोश्री भागीरथी गोरे यांचे निधन

एमपीसी न्यूज –  महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ( Chakan) सदस्य नितीन गोरे यांच्या मातोश्री भागीरथी गोरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्या 72 वर्षांच्या होत्या.

Pune : नगर रोडवरील टँकरमधून झालेल्या वायुगळतीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश; मोठा धोका टळला

चक्रेश्वर मंदिर चाकण येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी खेड तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी , कार्यकर्ते नागरिक खूप मोठ्या संखेने उपस्थित होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, सुना, नातवंडे, भाऊजय,दीर, पुतणे असा मोठा परिवार आहे.

श्रीमती भागीरथी गोरे यांच्या निधनाने संपूर्ण गोरे परिवार व चाकण आणि पंचक्रोशीतून दुखः व्यक्त होत आहे. चाकण पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय गुलाबशेठ गोरे हे त्यांचे पती ; तर स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे हे त्यांचे पुतणे ( Chakan) होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.