WPL 2024: वृंदा दिनेश, काशवी गौतम युवा अनकॅप खेळाडू करोडपती; वुमन्स प्रीमियर लीगमध्ये लिलाव

एमपीसी न्यूज – वुमन्स प्रीमियर लीगमध्ये 10 लाख (WPL 2024)बेस प्राईज असणाऱ्या वृंदा दिनेश, काशवी गौतम दोन युवा अनकॅप खेळाडू करोडपती झाल्या आहेत. यूपी वॉरियर्सने वृंदा दिनेश हिला 1.3 कोटी रूपयांना घेतलं तर गुजरात जायंट्सने काशवी गौतमसाठी 2 कोटी खर्च केले.

वुमन्स प्रीमियर लीगमध्ये 2024 चा लिलाव सुरू असून (WPL 2024)यामध्ये अनकॅप भारतीय खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडला आहे. या लिलावामध्ये चांगल्या-चांगल्या खेळाडू अनसोल्ड राहिल्या, त्यांच्यावर कोणाही बोली लावली नाही.

PCMC : सुरक्षित मातृत्व आश्वासन अंतर्गत 8 रुग्णालये

मात्र दोन भारतीय महिला अनकॅप खेळाडूंवर सर्वात मोठी बोली लागली आहे. अंडर 19 खेळाडू वृंदा दिनेश हिची बेस प्राईज 10 लाख रूपये होती. वुंदा दिनेश हिला आपल्या ताफ्यात सामील करून घेण्यासाठी गुजरात जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात चांगलीच लढाई सुरु होती. त्यानंतर यामध्ये यूपी वॉरियर्सनेही सहभाग घेतला. अखेर यूपी वॉरियर्सने वृंदा दिनेश हिला 1.3 कोटी रूपयांना घेतलं.

दुसरी खेळाडू ही काशवी गौतम ही यंदाच्या वुमन्स प्रीमियर लीगमध्ये सर्वात महागडी खेळाडू ठरली. काशवी गौतम हिला 2 कोटी रूपयांची बोली लागली आहे. हमरमनप्रीत कौर पेक्षाही काशवी गौतम हिला जास्त रक्कम बोली लागली आहे. गुजरात जायंट्सने काशवी गौतमसाठी 2 कोटी खर्च केले. तिचीसुद्धा बेस प्राईज ही 10 लाख होती. काशवी गौतम ही एक वेगवान गोलंदाज आहे.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.