IPL 2023 – कर्णधार पद पुन्हा विराट कोहलीच्या हाती?

एमपीसी न्यूज –  गुरुवारी 20 एप्रिल रोजी (IPL 2023)  दुपारी झालेल्या सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने पंजाब कींग्जला 24 धावांनी हरवले. या सामन्यामध्ये बेंगळुरूच्या विजयापेक्षा विराट कोहली पुन्हा एकदा साधारण 450 दिवसांनी आरसीबीचा कर्णधार म्हणून खेळला. याचे समर्थकांना जास्त कौतुक आहे. पण, समर्थकांना प्रश्न आहे की कोहली फक्त तात्पुरता कर्णधार आहे का त्याने कायमसाठी वापसी केली आहे?

प्रत्येक आयपीएल चाहत्याला आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू समर्थकांना आश्चर्याचा धक्काच बसला, जेव्हा त्यांनी विराट कोहली याला कर्णधार म्हणून नाणेफेक वेळी पहिले. बऱ्याच जणांना आधी वाटले, की आरसीबीचा मुख्य कर्णधार डू प्लेसिस याने कुणाला न सांगता कर्णधार पदाचा राजीनामा दिला की काय? परंतु, माहितीनुसार असे काहीही नसून कोहली फक्त काही वेळेसाठीच कर्णधार असेल.

Pimpri : किवळे दुर्घटनेतील नागरिकांना महापौर निधीतून मदत करा – अजित गव्हाणे

चेन्नई सुपर किंग्ज यांचा विरुद्ध खेळताना फाफ डू प्लेसिस  रनआउट होऊ नये म्हणून त्याने डाईव मारली आणि तेव्हा त्याला दुखापत झाली. त्यामुळे तो क्षेत्ररक्षण करू शकणार नाही आणि आयपीएलमध्ये भर इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फक्त फलंदाजी करेल. कर्णधार पदी तो पूर्ण सामना खेळू शकणार नाही म्हणून आरसीबी कर्णधारपद विराट कोहली याने घेतले आहे.

2013 ते 2021 पर्यंत विराट कोहलीच रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा कर्णधार होता. परंतु, सतत मिळालेले अपयश म्हणून त्याने नवीन काहीतरी करायच्या प्रयत्नात कर्णधार पदावरून 2021 मध्ये राजीनामा दिला होता. परंतु, तो आता पुन्हा कर्णधार पदी आला आहे आणि स्वतःच्या चुकांमधून शिकून तो (IPL 2023) यावर्षी बेंगळुरूला कुठपर्यंत नेणार आहे  हे पाहणे रोमांचकारी ठरले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.