Pune News : 82 ठिकाणी एकाच वेळी होणार महारक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज – गेल्या दोन दशकांहून (Pune News) अधिक काळ ‘श्री अनिरुद्ध आदेश पथक’, ‘दिलासा मेडिकल ट्रस्ट अँड रिहॅबिलिटेशन सेंटर’, ‘अनिरुद्धाज् अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट’, ‘अनिरुद्ध समर्पण पथक’ या संस्थेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जाते. यावर्षी हे शिबीर रविवार दि 23 एप्रिल रोजी, पुणे शहर व पिंपरी चिंचवडसाठी आबासाहेब गरवारे कॉलेज येथे सकाळी 9 ते संध्याकाळी 6 येथे होणार आहे.
आपल्या देशाला दरवर्षी सुमारे 30 लाख यूनिट्स इतकी रक्ताची कमतरता भासते. याच कारणामुळे रक्तदान हा आपल्या कर्तव्याचा भाग ठरतो. डॉ. अनिरुद्ध जोशी, एम. डी. मेडिसिन (सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू) यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाने स्थापन झालेल्या या संस्थांनी 1999 सालापासून रक्तदान शिबिरांचे आयोजन करून आत्तापर्यंत 1.65 लाख युनिट इतके रक्त संकलित केले आहे. या संस्थांमार्फत यावर्षीही पुणे शहर, पिंपरी चिंचवड सहित, तळेगाव, जुन्नर, दौंड, बारामती, मुंबई व महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक व मध्यप्रदेशात मिळून तब्बल 82 ठिकाणी एकाच वेळी हे महारक्तदान शिबीर आयोजित केले आहे.
Pimpri : गौतमी पाटीलच्या अश्लिल नृत्यावर राज्यात बंदी घालावी, प्रदिप नाईक यांची मागणी
याआधी मुंबईत 2019 साली या संस्थांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात एकाच दिवशी मुंबईत सुमारे 8,973 युनिट इतके, तर महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये मिळून 15,937 युनिट इतके रक्तसंकलन करण्यात यश मिळविले होते. हा अनुभव लक्षात घेता 23 एप्रिल रोजीच्या महारक्तदान शिबिरालाही प्रचंड (Pune News) प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे.