Talegaon Dabhade : पोलीस असल्याची बतावणी करून दागिने पळवले

एमपीसी न्यूज – पोलीस असल्याची बतावणी करून दोन अनोळखी व्यक्तींनी (Talegaon Dabhade) महिलेचे दागिने कागदात बांधून देण्याचा बहाणा केला. दागिने बांधताना हातचलाखी करून एक लाख 65 हजारांचे दागिने लंपास केले. ही घटना बुधवारी (दि. 20) दुपारी सव्वादोन वाजता बीएसएनएल कार्यालयाजवळ, तळेगाव दाभाडे येथे घडली.

याप्रकरणी महिलेने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात फिर्याद दिली आहे.

Pimpri : वीजग्राहकांकडे  124 कोटी 77 लाखांची थकबाकी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला रस्त्याने पायी चालत जात होत्या. स्टेशन रोडवरील बीएसएनएल कार्यालयाजवळ आल्यानंतर दोन अनोळखी व्यक्ती त्यांच्याजवळ आले. त्यांनी आपण पोलीस आहोत, अशी बतावणी केली. त्यानंतर फिर्यादी यांच्या अंगावरील दागिने सुरक्षित कागदात बांधून ठेवण्यास सांगितले. मंगळसूत्र, पाटली असे एक लाख 65 हजार रुपये किमतीचे दागिने फिर्यादी यांनी काढून दिले. आरोपींनी ते कागदात बांधून देण्याचा बहाणा करून हातचलाखीने दागिने काढून घेत फसवणूक केली. तळेगाव दाभाडे पोलीस (Talegaon Dabhade) तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.