आत्याच्या मुलानेच बलात्कार केला, 27 वर्षीय तरुणीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : लग्नाचे अमिष दाखवून आत्याच्या मुलानेच वारंवार बलात्कार केल्याचा आरोप एका 27 वर्षे तरुणीने केला. या तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुलै 2019 ते ऑक्टोबर 2022 या कालावधीत वारंवार हा प्रकार घडला. याप्रकरणी एका 27 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुण हा फिर्यादी यांच्या आत्याचा मुलगा आहे. लग्नाचे आमिष दाखवून त्याने वेळोवेळी त्याच्यासोबत शरीर संबंध ठेवले. फिर्यादीच्या नकळत त्याने शरीर संबंधाचा व्हिडिओ बनवून व फोटो काढून हे फोटो व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी शरीर संबंध ठेवले. तसेच फिर्यादी यांना नशेचे पदार्थ देऊन त्याच्यासोबत अश्लील वर्तनही केले आहे.

पोलीस ठाण्यातच पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; पती-पत्नीवर गुन्हा दाखल

पीडित तरुणी दिलेल्या तक्रारीनंतर सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.