पत्नीच्या मित्रावर प्राणघातक हल्ला, पतीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : पत्नीला भेटण्यासाठी आलेल्या तिच्या मित्राला पतीने लाथाबुक्याने आणि लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. हवेली तालुक्यातील वडकी नाला येथे 29 ऑक्टोबर रोजी हा सर्व प्रकार घडला. या प्राणघातक हल्ल्यात एक व्यक्ती जबर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल कामठे (वय 23) हा तरुण या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. आरोपी संतोष माणिक जाधव यांच्या विरोधात पुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल महादेव मगर (वय 27) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

Chinchwad Crime News : किरकोळ कारणावरून व्यावसायिकावर वार

याप्रकरणी अधिक माहिती अशी की विशाल कामटे हा फिर्यादी राहुल मगर यांचा भाचा आहे. 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता तो वडकी नाला परिसरातील एका लॉज जवळ ओळखीच्या महिलेला भेटण्यासाठी गेला होता. यावेळी त्या महिलेचा पती त्या ठिकाणी आला आणि त्याने माझ्या पत्नीला का बोलतो आणि तिला का भेटतो या कारणावरून विशाल कामठे याच्यासोबत वाद घातला.

त्यानंतर चिडून जाऊन त्याला ठार मारण्याच्या उद्देशाने लाथा बुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने शरीरावर आणि डोक्यात जबर मारहाण केली. यामध्ये विशाल कामठे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक हंबीर अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.