पोलीस ठाण्यातच पोलीस अधिकाऱ्याला मारहाण; पती-पत्नीवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज: पुण्यातील विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या आधीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणलेल्या एका दाम्पत्याने पोलीस चौकीतच गोंधळ घालत पोलीस अधिकाऱ्यांसोबत धक्काबुक्की करत त्यांना मारहाण केली. महिला कॉन्स्टेबल आणि महिला पोलीस अधिकाऱ्याला मारहाण केल्याची माहिती समोर येते आहे.

MP supriya sule: ‘ट्रेकिंग’ करत खासदार सुप्रिया सुळे पोहोचल्या किल्ले राजगडावर; लोकांना केलं ‘हे’ आवाहन

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पती-पत्नीतील भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्याला आणि पोलीस कॉन्स्टेबलला धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आली. इतकेच नाही तर या दांपत्याने काही काळ पोलीस ठाण्यातच गोंधळ देखील घातला. अखेर या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.