AAP : आंदोलन करणाऱ्या आपच्या 30 ते 40 कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

एमपीसी न्यूज : आम आदमी पक्षाच्या 30 ते 40 कार्यकर्त्यांना पोलिसांनी (AAP) ताब्यात घेतले आहे. आंदोलन स्थळी तणाव निर्माण झाल्यामुळे कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंग यांना ईडीने अटक केल्याच्या विरोधात येरवडा येथील सरकारच्या सीबीआय तपास यंत्रणा कार्यालया बाहेर आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केले. मात्र, ईडीचे आंदोलन (AAP) सीबीआयच्या कार्यालयाबाहेर सुरू असल्यामुळे पोलिसांनी कार्यकर्त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला.

Mahalunge : हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालणाऱ्या पाच महिलांविरोधात गुन्हा दाखल

या दरम्यान मात्र पोलिस व कार्यकर्ते यांच्यामध्ये बाचाबाची झाल्यामुळे आंदोलन स्थळी तणाव निर्माण झाला. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ सर्व आंदोलकांना ताब्यात घेतले. आम आदमी पक्षाच्या 30 ते 40 कार्यकर्त्यांना सध्या विश्रांतवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.