तोतया पोलिसांनी नागरिकाला मारहाण करत लुटले

एमपीसी न्यूज – तोतया पोलिसांनी नागरिकाचे अपहरण करून मारहाण करत लुटले आहे. हा प्रकार 30 ऑक्टोबर रोजी खेड येथील पिंपळगाव येथे घडली.

विशाल विष्णू देवकर (वय 38 रा.भोसरी) यांनी फिर्याद दिली असून तीन अज्ञाता विरोधात  आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPC News Podcast 1 November 2022 : ऐका…आजचे एमपीसी न्यूज पॅाडकास्ट

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पिंपळगाव येथे रोडवर उभे असताना आरोपी लाल रंगाच्या ब्रेझा गाडीमधून आले व त्यांनी फिर्यादी यांना पोलीस असल्याचे सांगत फिर्यादीच्या गाडीची कागदपत्रे मागितली, तसेच फिर्यादी यांना पोलीस असल्याचे सांगत  गाडीत बसवून लांब घेऊन गेले. फिर्यादीचा 68 हजार रुपयांचा मोबाईल काढून घेतला. यावेळी फिर्यादी यांनी विरोध केला असता आरोपींनी हाताने व लोखंडी मारहाण करून जखमी केले. यावरून आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.