Pune : पोलीस असल्याची बतावणी करून पाच लाख उकळले, एकाला अटक

एमपीसी न्यूज : पोलीस असल्याची बतावणी (Pune) करून तुमच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहेत, असे खोटे सांगून तोतयाने एका व्यक्तीकडून तब्बल पाच लाख रुपये उकळले. आपली फसवणूक झाल्याची लक्षात आल्यानंतर या व्यक्तीने पोलिसात धाव घेतली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तोतयाला अटक करण्यात आली आहे.

मधुकर विलास सापळे (वय 32, रा. आंबेगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आह. अजय गुलाबराव भोसले (वय 32) त्यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. चंदन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Pune Crime : हॉटेल व्यवसायात पार्टनर असलेल्या 45 वर्षीय महिलेवर बलात्कार, गुन्हा दाखल

अधिक माहिती अशी की, आरोपीने फिर्यादीला (Pune) एप्रिल ते जून या कालावधीत पोलीस असल्याची बतावणी करून फिर्यादी विरोधात वेगवेगळ्या गुन्हा कोर्टात केसेस सुरू आहेत आणि आणखी गुन्हे दाखल करण्याची खोटी भीती दाखवली. तसेच फिर्यादी राहत असलेल्या सोसायटीची निवडणूक रद्द करण्यासाठी वेळोवेळी त्यांच्याकडून तब्बल पाच लाख 5 हजार रुपये खंडणी स्वरूपात स्वीकारले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.