kondhava fire : कोंढवा येथे इमारतीला आग; आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर

एमपीसी न्यूज – कोंढवा येथील लुल्लानगर चौकातील मार्वल विस्टा बिल्डिंगला आग लागली आहे. ही आग आज (मंगळवारी) सकाळी सव्वा आठच्या सुमारास लागली. आगीची वर्दी मिळताच अग्निशमनदलाच्या 3 गाड्या व 2 टँकर घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर चालु आहे. 

याच इमारतीजवळ प्रसिद्ध क्रिकेटपटू झहीर खान याच्या मालकीचे रेस्टॉरंट आहे. ही आग कशामुळे लागली, आगीमध्ये नेमके काय नुकसान झाले आहे, याविषयी अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.