गाडीला कट मारला म्हणून मारहाण करत कारमधील पिकअप चोरले

एमपीसी न्यूज- गाडीला कट मारला म्हणून चार ते पाच जणांनी पिकअप चालकाला मारहाण करत त्याचे पिकअप चोरत लुटले. ही घटना 31 ऑक्टोबर रोजी कुरळी येथे घडली आहे.

अतिश अनिल शेळके (वय 21 रा. सिन्नर, नाशिक) यांनी फिर्याद दिली असून संदिप दिलीप बोडके (वय 25) संतोष राम किसन सुर्यवंशी (वय 22) दोन अनोळखी इसम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पत्नीच्या मित्रावर प्राणघातक हल्ला, पतीवर गुन्हा दाखल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांची बोलेरो पिकअप गाडी (एमएच 15 डीके 2198) मधून कोथिंबीर घेऊन नाशिक हायवेने पुण्याकडे येत होते. यावेळी आरोपी त्यांच्या दुचाकीवरून आले व त्यांनी फिर्यादीची गाडी अडवली. यावेळी आरोपींनी तू गाडीला कट का मारला म्हणून हुज्जत शिवीगाळ करत गाडीखाली ओढले.

मारहाण करत बळजबरी दुचाकीवर बसवून नेऊन त्यांच्या खिशातील मोबाईल, रोख 3 हजार रुपये काढून घेत पिकअप असा एकूण 6 लाख 75 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. यावरून चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.