Fire : देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर दुकानाला आग

एमपीसी न्यूज – देहूरोड-कात्रज बाह्यवळण मार्गावर कोयते वस्ती पुनावळे येथे एका दुकानाला आग लागली. ही घटना आज (मंगळवारी, दि. 21) दुपारी घडली. (Fire) स्थानिक नागरिकांनी आगीची वर्दी अग्निशमन विभागाला दिली. त्यानुसार प्राधिकरण आणि रहाटणी उपविभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु आहे. आगीचे कारण आणि नुकसान याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.