Nigdi News : मॉडर्न हायस्कूल मध्ये शिवजयंती साजरी

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निगडीतील मॉडर्न हायस्कूल येथे उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने प्रशालेत विविध स्पर्धांचे (Nigdi News) आयोजन करण्यात आले होते. यात रांगोळी, चित्रकला, वक्तृत्व, वेशभूषा, निबंध इ. तसेच विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी पोवाडा, शिवगीत,  शिवगर्जना, राजमुद्रा, भाषणे सादर केली. सर्व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद लुटला. प्रशालेचे मुख्याध्यापक प्रकाश पाबळे, पर्यवेक्षिका वर्षा पाचारणे, संस्था सदस्य कुटे यांनी प्रतिमेचे पुजन करून कार्यक्रमाची सुरूवात केली.

यावेळी मुख्याध्यापकांनी  विद्यार्थ्यांशी संवाद साधताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रेरणादायी इतिहास वर्णन केला. वक्तृत्व स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय क्रमांक आलेल्या श्रुती डौले, आर्या जामदार यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रेरणादायी इतिहास रंजक पद्धतीने विद्यार्थ्यांनसमोर मांडला.

Pune Crime : देशी पिस्टल व काडतुसासह सराईताला अटक

या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी  प्रशालेच्या प्र मुख्याध्यापक मृगजा कुलकर्णी, प्रशालेचे मुख्याध्यापक प्रकाश पाबळे सर, पर्यवेक्षिका वर्षा पाचारणे यांचे मार्गदर्शन लाभले. (Nigdi News) अधिकारी मीना,.पाडळे कुसुम, कुंजीर आशा, बौत्रे मनीषा, सलगर वृषाली,.चव्हाण जयश्री,.ठोंबरे सुजाता,  गायकवाड कविता, सोनवणे गंगाधर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष गजानन एकबोटे, संस्थेचे कार्यवाह शामकांत देशमुख, शाळा समिती अध्यक्ष चिंतामणी घाटे, शाळेच्या प्रमुख्याध्यापिका मृगजा कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता गायकवाड यांनी केले. गंगाधर सोनवणे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.