Pune Crime : देशी पिस्टल व काडतुसासह सराईताला अटक

एमपीसी न्यूज देशी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसे (Pune Crime) याच्यांसह सराईत आरोपीला दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. हि कारवाई रविवारी (दि.20) दांडेकर पुल येथे करण्यात आली आहे.

गणेश नंदकुमार महामुनी (वय 28 रा. सिंहगड रोड) असे अटक आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार कुंदन शिंदे, नवनाथ भोसले व अमित सुर्वे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार महामुनी हा शस्त्रासह दांडेकर पुलावर थांबला आहे.

Hotel Kshatriya : मनसोक्त नॉनव्हेज खायच आहे, तर क्षत्रियची जम्बो थाळी आहे ना!

त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे व त्यांच्या स्टाफने घटनास्थळी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे देशी बनावटीचे (Pune Crime) पिस्टल व दोन जिवंत काडतुसे असा एकूण 40 हजार 500 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. त्यानुसार दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.