Wakad : घरगुती गॅस सिलेंडर चढ्या भावाने विकणाऱ्या किराणा दुकानदाराला अटक

एमपीसी न्यूज – घरगुती वापराचे गॅस सिलेंडर किराणा दुकानातून चढ्या भावाने विकणाऱ्या किराणा दुकानदाराला वाकड (Wakad) पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 37 सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई सोमवारी (दि. 12) दुपारी थेरगाव येथे भक्तिश ट्रेडर्स या दुकानात करण्यात आली.

Pune Rain Update : पुणेकरांना पावसासाठी आणखी पाच दिवस पहावी लागणार वाट

दिनेश जवरीलाल ओस्तवाल (वय 43, रा. थेरगाव) असे अटक केलेल्या दुकानदाराचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार सौदागर लामतूरे यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने लोकांच्या जीवनात धोका निर्माण होईल हे माहिती असताना कोणतेही संभाव्य धोक्यापासून सुरक्षित राहण्यास पुरेसा बंदोबस्त केला नाही. घरगुती गॅस सिलेंडर टाक्यांची साठवणूक करून ती चढ्या भावाने वितरित केली.

याबाबत माहिती मिळाल्यानंतर वाकड पोलिसांनी कारवाई करत दुकानदारास ताब्यात घेतले. त्याच्याकडून 76 हजार 200 रुपये किमतीचे एकूण 37 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत. वाकड (Wakad) पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.