Dehuroad : पत्ते खेळताना खेळताना झालेल्या वादात तिघांवर चाकूने हल्ला; एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – बांधकाम मजुरांमध्ये (Dehuroad) पत्ते खेळताना वाद झाला. त्या वादातून एका कामगाराने तिघांवर चाकूने हल्ला केला. त्यात एकाचा मृत्यू झाला. तर दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना आज (मंगळवार, दि. 13) मध्यरात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास लक्ष्मीपुरा, देहूरोड येथे घडली.

 

सखाराम विश्वनाथ मरकाम (वय 25, रा. विजयपूर, जि. बिलासपुर, छत्तीसगढ) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. तर जोधिया विश्वनाथ मरकाम (वय 23, रा. विजयपूर, जि. बिलासपुर, छत्तीसगढ), संजय हरबंसलाल वर्मा (वय 28, रा. परतवाणी, जि. बलोदा बाजार, छत्तीसगढ) अशी जखमींची नावे आहेत. शिवप्रसाद धूर्वे (वय 28, रा. छत्तीसगढ) असे हल्ला करणाऱ्या कामगाराचे नाव आहे.

Pune Rain Update : पुणेकरांना पावसासाठी आणखी पाच दिवस पहावी लागणार वाट

पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, (Dehuroad) मंगळवारी मध्यरात्री सव्वाबारा वाजताच्या सुमारास लक्ष्मीपुरा येथे चार कामगार जुगार खेळत होते. दरम्यान जुगार खेळण्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यांनी एकमेकांना मारहाण केली. दरम्यान शिवप्रसाद याने सखाराम, त्याचा लहान भाऊ जोधिया आणि संजय या तिघांवर चाकूने हल्ला केला.

यामध्ये सखाराम याच्या छातीवर डाव्या बाजूला चाकूचा गंभीर वार झाल्याने त्यात त्याचा मृत्यू झाला. तर जोधिया आणि संजय हे गंभीर जखमी झाले आहेत.

याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.