Pimpri : पिंपरीमधून 50 ट्रॉफीजची चोरी

एमपीसी न्यूज –  पिंपरी येथे एका बंगल्याच्या पार्किंगमध्ये (Pimpri) ठेवलेल्या 50 ट्रॉफी एका महिलेने चोरून नेल्या. ही घटना सोमवारी (दि. 12) सकाळी सहा वाजताच्या सुमारास तपोवन मंदिराजवळ, पिंपरी येथे घडली.

जयप्रकाश हरीश वासवानी (वय 43, रा. तपोवन मंदिराजवळ, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी मधील तपोवन मंदिराजवळ फिर्यादी यांचा प्रगती बंगला आहे. त्यांच्या बंगल्याच्या पार्किंगमध्ये 12 हजार रुपये किमतीच्या 50 ट्रॉफी असलेला एक बॉक्स ठेवला होता. सोमवारी सकाळी सहा वाजताच सुमारास एका महिलेने त्या ट्रॉफीज चोरून नेल्या. पोलिसांनी महिलेला अटक केली आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Wakad : घरगुती गॅस सिलेंडर चढ्या भावाने विकणाऱ्या किराणा दुकानदाराला अटक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.