Crime News : मध्यस्थी करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकाला टोळक्याकडून मारहाण

एमपीसी न्यूज – रस्त्यावर सुरु असणाऱे भांडण सोडवणे एका हॉटेल व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले आहे.कारण तीन ते चार जणांच्या टोळक्याने डोक्यात काचेची बॉटल मारून व्यावसायीकाला गंभीर जखमी केले आहे.हा प्रकार चाकण येथे शनिवारी (दि.27) रात्री सव्वाअकरा वाजता घडला.

याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात महारुद्र शिवबसप्पा शिरगावी (वय 38 रा.चाकण) यांनी फिर्याद दिली असून मारूती रमेश थिगळे, विशाल लक्ष्मण चौधरी, योगेश काशीनाथ थिगळे, (सर्व राहणार खेड) माही रुपेश शिंदे (रा. चाकण) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे चाकण येथील चक्रेश्वर रोडवरील एका हॉटेल समोर हातातदारुच्या बाटल्या घेऊन भांडण करत होते.यावेळी फिर्यादी तेथून जात होते. त्यांची भांडणे पाहून फिर्यादी ते सोडविण्यासाठी तेथे गेले. यावेळी आरोपींनी फिर्यादीलाच लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. तर मारूती याने दारुची काचेची बॉटल फिर्यादी यांच्या डोक्यात मारून गंभीर जखमी केले. तसेच जिवे मारण्याच्या हेतूने गाडीतील लोखंडी साहित्याने हातावर, पायावर व डोक्यात तसेच तोंडावर मारण्यात आले. यावरून चाकण पोलिसांत खूनाच्या प्रयत्नाचा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.