Crime News : छळ करणाऱ्या पती व नणदा यांच्या विरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – दारू पिऊन मारणारा नवरा व छळणाऱ्या नणदांच्या विरोधात रावेत पोलीस ठाण्यात पिडीतेने तक्रार दाखल केली आहे.हा प्रकार 10 मे 2021 ते 22 जून 2022 या कालावधीत मलाड मुंबई येथे घडला.

याप्रकरणी पोलिसांनी तक्रारीवरून पती वैभव भानूदास काटे व दोन नंणदा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी यांचा पती हा दारू पिऊन रोज मारहाण करत होता, तसेच नणदा या पतीचे कान भरून पती-पत्नीमध्ये भांडण लावत व फिर्यादींच्या आई-वडीलांबद्दल वाईट बोलत, अशी तक्रार रावेत पोलिसात केली असून रावेत पोलीस याचा पुढील तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.