Crime News : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा अटकेत

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीशी गैरवर्तणूक करणाऱ्या आरोपीला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.27) रात्री सव्वादहाच्या सुमारास नेहरुनगर येथे घडला.

याप्रकरणी 25 वर्षीय तरूणीने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी अतुल मतिलाल पंडुरे (वय 52 रा.उद्यमनगर, पिंपरी) या आरोपीला अटक केली असून त्याला न्य़ायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी व नातेवेईक मुलगी या दोघी अंडी आणण्यासाठी दुकानात जात होत्या.यावेळी आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीला पाचशे रुपये देऊ करत हात पकडून गैरवर्तन केले. याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी व त्यांचा भाऊ,मुलगा गेले असता आरोपीने त्यांनाही शिवीगाळ करत हाताने मारहाण केली.यावरून पिंपरी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.