Aditya L 1 :  आदित्य एल 1 यान त्याच्या नियोजित ठिकाणी पोहचले

एमपीसी न्यूज –  इस्रोकडून लाँन्च ( Aditya L 1 ) करण्यात आलेले आदित्य एल 1 हे यान त्याच्या नियोजित ठिकाणी पोहचले आहे. यामुळे भारताला आता सूर्याचा अभ्यास करता येईल.  आदित्य L-1 हे  L-1 बिंदूवर पोहोचलं आहे. सूर्याच्या L-1 बिंदूला  halo orbit म्हणतात. 2 सप्टेंबर 2023 मध्ये इस्रोने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य L-1 हे अंतराळात पाठवले होते.

Pune : शरद मोहोळ खून प्रकरणातील आरोपी वकिलांना कोर्टात आले रडू

इटालियन-फ्रेंच गणितज्ञ जोसेफ लुई लॅग्रेंज यांच्या नावावरून लॅग्रेंज पॉईंट्सची नावे आहेत. सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये पाच लॅग्रेंज पॉईंट आहेत. यातील L1 वर हे यान पाठवण्यात आलं आहे. पृथ्वीपासून L1 चे अंतर सुमारे 1.5 दशलक्ष म्हणजेच 15 लाख किलोमीटर आहे. म्हणजेच आदित्य-एल1 पृथ्वीपासून तब्बल 15 लाख किलोमीटर दूर पाठवण्यात आलंय.

आदित्य एल1 मध्ये सात पेलोड्स बसवण्यात आले आहेत. यामधील चार पेलोड्स हे थेट सूर्याचा अभ्यास करणार आहेत. तर उर्वरित तीन हे वातावरणाचा अभ्यास करतील. विशेष म्हणजे ग्रहणकाळात देखील सूर्याचा अभ्यास करण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नसल्याचं इस्रोच्या शास्रज्ञांकडून सांगण्यात येत ( Aditya L 1 ) आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.