Pune : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे – डॉ. न. म. जोशी

एमपीसी न्यूज – रोटी, कपडा, मकान प्रमाणे साहित्य ( Pune) महत्वाचे आहे. काळ फार बदलला आहे. विचारात बदल होणे, ही गंभीर बाब असून, संस्कृती बदलत चालली आहे. देशात जी वाळवंटी परिस्थिती  निर्माण झाली, त्यात साहित्य संमेलन महत्वपूर्ण आहे. नाट्य संमेलनासाठी पैसे घेणे चुकीचे नाही. राजकारण्यांना बोलावणे ते चुकीचे नाही. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. पण, सरकार काही द्यायला तयार नाही. आपण स्वाक्षरी तरी देवनागरीत करता का? याचा विचार केला पाहिजे. माझी संस्कृती देवनागरी म्हणून साजरी करा, संपूर्ण वारजेत ही भूमिका साकारली पाहिजे, असे स्पष्ट मत सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. न. म. जोशी यांनी व्यक्त केले.

पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समिती साहित्यिक कट्टा वारजे आयोजित एक दिवसीय मराठी साहित्य संमेलन आयोजित केले होते. त्याचे उदघाटन संमेलनाध्यक्ष डॉ. न. म. जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी महिला अयोग महाराष्ट्र राज्य अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुणे जिल्हा बँकेचे संचालक विकासनाना दांगट, शिवचरित्रकार ह. भ. प. धर्मराज महाराज हांडे, श्री क्षेत्र आळंदी देवस्थानचे विश्वस्त डॉ. भावार्थ रामचंद्र देखणे, म. सा. प. पुणे कार्यवाह वि. दा. पिंगळे, स्वागताध्यक्ष बाबा धुमाळ, निमंत्रक आणि पुणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली प्रदीप धुमाळ, जेष्ठ साहित्यिका डॉ. माधवी वैद्य, सुप्रसिद्ध नाट्य व सिने अभिनेते अण्णा नाईक ‘रात्रीस खेळ चाले’ फेम माधव अभ्यंकर, सचिव डी. के. जोशी यावेळी उपस्थित ( Pune) होते.

Aditya L 1 :  आदित्य एल 1 यान त्याच्या नियोजित ठिकाणी पोहचले

सकाळी राजयोग गणेश मंदिर ते बायफ संस्था दरम्यान ग्रंथदिंडी काढण्यात आली. यावेळी उद्योगरत्न पुरस्कार अनिल हिंगे यांना, समाजरत्न पुरस्कार प्रा. एस. आर. पाटील यांना, महिला साहित्यरत्न पुरस्कार निर्मला कैलास खिलारे यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

रुपाली चाकणकर म्हणाल्या, वारजे ही साहित्यिकांची खाण आहे. मला पुस्तके प्रचंड आवडतात. राजकारणात असल्याने थोडा वेळ कमी पडतोय. बाबा आणि दीपालिताई साहित्य क्षेत्रात चांगले काम करतायेत. वारजेतून महाराष्ट्राला चांगले साहित्यिक मिळतात.

दिपाली धुमाळ म्हणाल्या, आपल्या भागात 7 ते 8 वर्षांपूर्वी वारजे साहित्यिक कट्टा सुरू केला. दर महिन्याला आम्ही 1 कार्यक्रम करतो. ज्येष्ठ मंडळी मोठ्या उत्साहाने काम करतात.

बाबा धुमाळ म्हणाले, एक दिवसीय साहित्य संमेलन आयोजित करण्याचा निर्णय झाला. परिसरातील नवोदित लेखकांचे पुस्तक प्रकाशन करण्याचे ठरविले. वारजे परिसरातील साहित्यिकांना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले. साहित्यिक कट्ट्याची व्याप्ती वाढवितोय.

डॉ. भावार्थ देखणे म्हणाले, बाबा गेल्यावर महिना भरात बाबा धुमाळ यांनी ग्रंथालय निर्माण केले. साहित्य संमेलनातून विचाराची देवाण घेवाण होते. ग्रंथ, संत, साहित्य महत्वपूर्ण आहे. यावेळी वि. दा. पिंगळे यांनी आभार ( Pune) मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.