Aditya-L 1 : चंद्रानंतर इस्रोचे लक्ष आता सूर्यावर; शनिवारी इस्रो घेणार सूर्याच्या दिशेने झेप

एमपीसी न्यूज : चांद्रयान-3 च्या यशानंतर भारताचे (Aditya-L 1) पुढचे मिशन सूर्य असणार आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रो 3 सप्टेंबर रोजी म्हणजेच येत्या शनिवारी एक यान पाठवत आहे. यासाठी आदित्य-एल1 अवकाशात झेप घेणार आहे. आदित्य-एल 1 हा पूर्णपणे स्वदेशी प्रयत्न आहे. दोन आठवड्यांपूर्वी आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथील इस्रोच्या अंतराळ केंद्रात आदित्य एल वन आणण्यात आले आहे. L1 ला सूर्यावर पोहोचण्यासाठी चार महिने लागणार आहेत. इस्रो या वर्षी गगनयान 1 मोहीम सुरू करणार आहे. त्यानंतर 2024 मध्ये शुक्रयान आणि मंगळयान मोहिमेला पाठवण्याची योजना आखण्यात आली आहे.

काय आहे सूर्ययान मोहीम? 

आदित्य एल-1 ही सूर्याचा अभ्यास करणारी पहिली भारतीय अवकाश-आधारित वेधशाळा असेल. त्याचे काम 24 तास सूर्यावर लक्ष ठेवणे हे असेल. पृथ्वी आणि सूर्याच्या प्रणालीमध्ये पाच लॅग्रॅन्जियन बिंदू आहेत. लॅग्रॅन्गियन पॉईंट 1 (L1) भोवती सूर्ययान प्रभामंडल कक्षेत स्थित असेल. पृथ्वीपासून L1 बिंदूचे अंतर 1.5 दशलक्ष किमी आहे तर पृथ्वीपासून सूर्याचे अंतर 150 दशलक्ष किमी आहे. L1 बिंदू निवडला गेला आहे, कारण येथून सूर्याचे (Aditya-L 1) दिवसाचे 24 तास, आठवड्याचे सात दिवस, अगदी ग्रहणांच्या वेळी देखील निरीक्षण केले जाऊ शकते.

Maval : धामणे गावात सिलेंडरचा स्फोट

सूर्याचा अभ्यास करून काय साध्य होईल?

हे यान सात पेलोड वाहून नेणार आहे. हे पेलोड्स फोटोस्फियर (फोटोस्फियर), क्रोमोस्फियर (सूर्याच्या दृश्य पृष्ठभागाच्या अगदी वरची पृष्ठभाग) आणि सूर्याच्या सर्वात बाहेरील थर (कोरोना) यांचा आढावा घेतील. सूर्यामध्ये होणार्‍या स्फोटक प्रक्रियेमुळे पृथ्वीजवळील अवकाश क्षेत्रात समस्या निर्माण होऊ शकतात.

अनेक उपग्रहांचे नुकसान होऊ शकते. अशा प्रक्रिया पूर्वी आढळल्यास, प्रतिबंधात्मक पावले उचलली जाऊ शकतात. सर्व अंतराळ मोहिमा चालवण्यासाठी अवकाशातील हवामान समजून घेणे आवश्यक आहे. या मोहिमेमुळे अवकाशातील हवामान समजण्यासही मदत होऊ शकते. याद्वारे सौर वाऱ्यांचाही अभ्यास केला जाणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.