ISRO : गगनयान मोहिमेची चाचणी 21 ऑक्टोबरला – इस्रो

एमपीसी न्यूज – अंतराळातील विविध रहस्य शोधण्यासाठी, गगनयान (ISRO) मोहिमेचे पहिली चाचणी उड्डाण 21 ऑक्टोबर रोजी होणार आहे. यानंतर आणखी तीन चाचणी उड्डाणे पाठवली जाणार त्याबाबत  त्याबाबत भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने सोमवारी त्यांच्या गगनयान मिशनसाठी चाचणी उड्डाण वेळापत्रक जाहीर केले आहे.

“मिशन गगनयान:” TV-D1 चाचणी उड्डाण 21 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 7 ते 9 च्या दरम्यान SDSC-SHAR,  श्रीहरिकोटा येथून करण्यात येणार आहे. त्यासाठी ISRO ने क्रू मॉड्यूल (CM) चे फोटो देखील शेअर केले आहेत.

Pune : महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे लाक्षणिक निदर्शने

आगामी गगनयान मोहिमेचा एक भाग म्हणून, इस्रो  21 ऑक्टोबर रोजी कॅप्सूलच्या (ISRO) कार्यक्षमतेची आणि आपत्कालीन सुटका प्रणालीची चाचणी करणार आहे.

या मोहिमेसह, इस्रोने या वर्षाच्या अखेरीस तीन अंतराळवीरांना पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठवण्याची योजना देखील आखली आहे.

उड्डाण चाचणीसाठी स्वदेशी LVM-3 रॉकेट वापरण्यात येणार आहे.  या चाचणी उड्डाण दरम्यान क्रू मॉड्यूल दबाव आणला जाईल आणि क्रायोजेनिक, द्रव आणि स्थायू टप्यासह LVM-3 रॉकेट वापरून ते अंतराळात सोडले जाणार आहे.

चाचणीचा एक भाग म्हणून, ISRO  क्रू मॉड्यूलच्या विविध घटकांचे देखील मूल्यमापन करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले (ISRO) आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.