Pune : महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे लाक्षणिक निदर्शने

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघाने वीज ऊद्योगातील कंत्राटी (Pune)कामगारांच्या महत्वपूर्ण प्रलंबित प्रश्नांबाबत 1 नोव्हेंबर रोजी मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे. त्यानिमित्ताने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे लाक्षणिक निदर्शने करण्यात आली.

मंत्रालायावरील मोर्चामध्ये पुणे जिल्ह्यामधील सर्व कंत्राटी कामगारांनी न्याय हक्कांच्या (Pune)मागणीसाठी एकजुटीने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे पुणे जिल्हा अध्यक्ष सुमीत कांबळे व सेक्रेटरी निखिल टेकवडे यांनी केले आहे.

Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे बी फार्मसी महाविद्यालयात पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांचे स्वागत

संघटनेच्या मागण्याबाबत निवेदन जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांच्या वतीने निवासी जिल्हधिकारी ज्योती कदम यांनी स्विकारून ते मागणीपत्र सरकारकडे पाठविण्याचे आश्वासन दिले. यावेळी भारतीय मजदूर संघ पुणे जिल्हाध्यक्ष अर्जुन चव्हाण, महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे सरचिटणीस सचिन मेंगाळे, उपमहामंत्री राहूल बोडके, संघटनमंत्री उमेश आणेराव, मार्गदीप मस्के शिष्टमंडळात सहभागी होते.

महत्वपूर्ण मागण्या

1) राज्यातील महावितरण, महापारेषण, व महानिर्मिती कंपनीतील नियमित मंजूर रिक्त पदांवर मागील 15 ते 20 वर्षेपासून फक्त 14हजार, 15 हजार रूपये प्रति माहे काम करत असलेल्या अनुभवी व कुशल वीज कंत्राटी कामगारांना कंत्राटदार विरहित रोजंदारी पद्धतीने वयाच्या 60 वर्षा पर्यंत जॉब सिक्युरिटी देऊन सेवेत सामावून घ्यावे .

2) समान काम , समान वेतन द्यावे

3) संविधानिक शासकीय देय रकमेचा अपहार करणाऱ्या व कामगारांचे आर्थिक शोषण करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्यात यावे.

4) अन्याय ग्रस्त कामगारांना कामावर घ्यावे .

5) प्रलंबित धोरणात्मक निर्णय होईपर्यंत या कामगारांना प्रति माहे रू 20,000 पगार वाढ देण्यात यावी.

6) सध्या कार्यरत असलेल्या कामगारांना कायम नोकरीत समाविष्ट करून कंत्राटी कामगार पध्दत बंद करण्यात यावी. या मागण्यांबाबत निवेदन महाराष्ट्र राज्य व उर्जा मंत्री यांना देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्याकडे सुपूर्द केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.