Talegaon Dabhade : कृष्णराव भेगडे बी फार्मसी महाविद्यालयात पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांचे स्वागत

एमपीसी न्यूज – इंद्रायणी विद्यामंदिर संस्था संचलित (Talegaon Dabhade)कृष्णराव भेगडे इन्स्टिटयूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (बी फार्मसी) महाविद्यालयात प्रथम वर्ष बी फार्मसी व एम फार्मसी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. शनिवारी (दि. 14) कांतीलाल शाह सभागृहात हा स्वागत समारंभ (फ्रेशर्स पार्टी) झाला. अशी माहिती बी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे यांनी दिली.

इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या विश्वस्थ निरूपा कानिटकर यांची (Talegaon Dabhade) कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती होती.आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांशी विविध पाश्चात्य देशांतील फ्रेशर्स पार्टीच्या संस्कृतीची माहिती दिली. विद्यार्थी प्रतिनिधी अमेना सिम्मम हिने सर्व विद्यार्थी व उपस्थितांचे स्वागत केले. प्राचार्य डॉ. संजय आरोटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात फार्मसीचे विद्यार्थी उत्साहाने उपस्थित होते.कार्यक्रमास विद्यार्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.श्वेता कांबळे व प्रतीक भाईक यांनी केले,कु.काजल डोंगरे व मगन चौधरी यांनी आभार मानले.

Pimpri : पालिका म्हणते ‘तो उघडा चेंबर पालिकेचा नव्हे’ ; नागरिकांची रस्ते सुरक्षा “राम भरोसे”

सर्व कार्यक्रमाच्या यशस्वी व शिस्तबद्ध आयोजनासाठी प्रा. कादंबरी घाटपांडे व तेजमल बनसोडे यांसह सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. द्वितीय वर्ष बी. फार्मसी वर्गाच्या प्रतिनिधीचे मोलाचे सहकार्य लाभले. संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, कोषाध्यक्ष शैलेश शहा, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे,प्रा.जी. एस. शिंदे प्राचार्य डी.फार्मसी आदी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना कार्यक्रच्या शुभेच्छा दिल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.