Metro News : मेट्रोमध्ये जागतिक पांढरी काठी दिन साजरा

एमपीसी न्यूज – अंधांसाठी महत्वाची असलेल्या पांढ-या काठीचे महत्त्व (Metro News) विषद करण्यासाठी पुणे मेट्रोमध्ये जागतिक पांढरी काठी दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त एनएफबीएम जागृती अंध मुलींची शाळा, आळंदी येथील 30 विद्यार्थिनींनी मेट्रोची सफर अनुभवली.

Nigdi : एनआयबीआर कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमध्ये ‘आंतरराष्ट्रीय ब्रेड  डे’ निमित्त 50 ब्रेड्सचे प्रदर्शन

रोटरी क्लब ऑफ पिंपरी इलाईटच्या सौजन्याने ही सफर आयोजित करण्यात आली. आळंदी येथील एनएफबीएम जागृती अंध मुलींची शाळेच्या 30 विद्यार्थिनींना पीसीएमसी मेट्रो स्थानकावर आणले.

तिथून पीसीएमसी मेट्रो स्टेशन ते सिव्हील कोर्ट आणि परत असा मेट्रोच्या प्रवासाचा विद्यार्थिनींनी अनुभव घेतला.

यावेळी प्रत्येक विद्यार्थिनीच्या हातात पांढरी काठी होती. ही पांढरी काठी अंधांसाठी गतिशीलता प्रदान करते. 15 ऑक्टोबर हा जागतिक पांढरी काठी दिन म्हणून साजरा केला जातो.

त्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या काठीचे महत्व समाजात पोहोचविण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला.

पांढरी काठी घेऊन जाणाऱ्या व्यक्तींना समाजातील नागरिकांनी मदत करावी. त्यांना योग्य मार्ग दाखवावा. अंधांच्या हातात असलेल्या काठीत जादू आहे, त्यामुळे अंध व्यक्तीला सगळं समजतं, असे डोळस लोकांनी समजू नये.

ती एक साधी काठी असते. ज्याद्वारे अंध व्यक्ती त्यांच्या पुढे येणाऱ्या अडथळ्यांचा सामना (Metro News) करतात.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.