Pimpri : पालिका म्हणते ‘तो उघडा चेंबर पालिकेचा नव्हे’ ; नागरिकांची रस्ते सुरक्षा “राम भरोसे”

एमपीसी न्यूज – जुना मुंबई पुणे महामार्गावर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या (Pimpri) हद्दीत निगडी येथे, मुंबईकडे जाताना पवळे पुलाच्या सुरुवातीला  सर्विस रस्त्यावर भला मोठा चेंबर उघडा पडला आहे. त्या चेंबरमध्ये गाड्या आदळून अनेकवेळा नागरिक रस्त्यावर पडले आहेत. तथापि, आज सकाळपासून अनेक नागरिक त्या रस्त्यावर पडले आहेत.

Chikhali : रंगेहाथ पकडलेल्या चोरट्याने केली तिघांना मारहाण

त्याबाबत परिसरातील नागरिकांनी पालिकेला अनेक वेळा तक्रारी केल्याचे निदर्शनास आणून दिले. त्याबाबत एमपीसी न्यूज प्रतिनिधींनी संबधित अधिका-यांकडे चौकशी केली असता, ‘उघडा चेंबर पालिकेचा नसून अज्ञात दूरसंचार कंपनीचा असावा असे अस्पष्ट उत्तर पालिकेच्या अधिकाऱ्यांने दिले आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांची रस्ते सुरक्षा ‘राम भरोसे’ असल्याचे म्हटले जात आहे.

दापोडी ते निगडी सर्विस रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून रस्त्यावरील खड्डे आत्ता विस्तीर्ण स्वरूप धारण करताना दिसत आहेत.

पालिकेच्या हद्दीतून जाणाऱ्या या महत्वाच्या रस्त्याची दुर्दशा अनेकवेळा पालिकेच्या दृष्टीस आणून देण्याचे काम नागरिकांनी आणि एमपीसी न्यूजने केले आहे.

तथापि, पालिकेकडून केवळ मलमपट्टी करून तात्पुरते खड्डे बुजविण्यात येत आहेत. एखाद्या खड्ड्यात डस्ट टाकले जाते, त्यामुळे गाड्या घसरून अपघात होत आहेत.

काही ठिकाणी डांबर खडी टाकून ते खड्डे अशा पद्दतीने बुजविण्यात येतात की, खड्डा बुजविल्यामुळे रस्त्यात उंचवटा निर्माण होतो आणि नागरिकांना अधिक त्रास सहन करावा लागतो.

त्यामुळे ‘उपचारापेक्षा रोग बरा’ अशी अवस्था नागरिकांची होते. या मार्गावर ठिकठिकाणी रस्त्यांच्या मधोमध असलेले चेंबर खोल गेल्याचे आढळते. त्यामुळे गाड्यांचे मोठे नुकसान होताना दिसत आहे.

लोकांनी रस्त्यावर खोदलेल्या अनधिकृत चर तसेच खाजगी वाहिन्या टाकण्यासाठी खोदलेले चर उघडे ठेवण्यात येतात अथवा निकृष्ट कामामुळे ते उघडे पडतात.

त्याची कालांतराने त्याची नाली तयार होऊन रस्त्याच्या मधोमध दुभाजक तयार होतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहनांचे नुकसान होते. नागरिकांना पाठीचा व मणक्याचा त्रास होतो सहन करावा लागतो.

नागरिकांची प्रतिक्रिया :-

 किरण काळभोर (स्थानिक नागरिक)

पवळे ब्रिज येथील उघड्या चेंबरची तक्रार वारंवार पालिकेकडे केल्यावरही त्याबाबत कोणतीही कार्यवाही पालिकेकडून होत नाही. अनेकवेळा या उघड्या चेंबर मध्ये गाड्या अडखळून नागरिक रस्त्यावर पडले आहेत.

सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. आम्ही त्या चेंबरमध्ये गट्टू, झाडांचा हिरवा पाला टाकून तो बुजविण्याचा प्रयत्न केला.

रतनकुमार अय्यर ;-

रस्त्यावरील चेंबर बाबत दि. 16, 17, 19, 27 सप्टेंबर आणि 3 ऑक्टोबर रोजी तक्रार (Pimpri) दिली आहे. त्यावेळी पालिकेच्या अधिका-यांनी स्पॉट वर भेट देऊन केवळ त्या उघड्या चेंबरमध्ये डस्ट टाकले होते.

आता ती डस्ट उतरली असून सकाळपासून अनेक नागरिक त्याठिकाणी रस्त्यावर पडले आहेत. नागरिकांना हलके लागले असून अनेकांच्या गाड्यांचे नुकसान झाले आहे.

उप अभियंता संजय काशीद (बीआरटीएस) :- तो उघडा चेंबर महापालिकेचा नाही! एखाद्या खाजगी दूरसंचार कंपनीचा असेल. त्या कंपनीने तो भरला नसावा. आमची लोक थोड्या वेळात तेथे पोहचून त्यावर कार्यवाही करतील.

सह शहर अभियंता प्रमोद ओंभासे (बीआरटीएस) :– पवळे ब्रिजजवळ असलेला चेंबर हा खाजगी दूरसंचार निगमांचा आहे. रस्त्याच्या मधोमध असल्याने सध्या तेथे मुरूम टाकून ते चेंबर बुजविण्यात येत आहे. थोड्या दिवसांनी तेथे डांबरीकरण करण्यात येईल.

उघड्या चेंबर बाबत नागरिकांनी अनेकवेळा तक्रार दिली असून त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने एमपीसी न्यूज ने केलेल्या पाठपुराव्यामुळे त्या उघड्या चेंबरचे काम सुरु करण्यात आले आहे.

तथापि, दापोडी ते निगडी रस्त्यावरील खड्डे कायमचे बुजविण्याचे काम कधी सुरु होईल याबाबत पालिकेने काहीही (Pimpri) सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.