Chikhali : रंगेहाथ पकडलेल्या चोरट्याने केली तिघांना मारहाण

एमपीसी न्यूज – दुकानातून साहित्य चोरून नेताना रंगेहाथ पकडलेल्या चोराने (Chikhali) दुकान मालकासह तिघांना मारहाण केली. ही घटना हरगुडे वस्ती, कुदळवाडी, चिखली येथे घडली.

अजीझू रहिमान उबैदुल्ला खान (वय 36, रा. कुदळवाडी, चिखली), धनीराम वर्मा, मगरुराम वर्मा अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी खान यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सनी विनोद गौड (वय 19, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी), संजय रानावत आणि विशाल (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dehuroad : पैसे देण्यास विरोध केल्याने तरुणास बेदम मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सनी याने त्याच्या (Chikhali) दोन साथीदारांसोबत मिळून फिर्यादी यांच्या दुकानातून दीड लाख रुपये किमतीचे कार्बाईड इनसर्ट नावाचे 200 किलो भंगार चोरून नेले. ही घटना 4 ऑक्टोबर रोजी रात्री नऊ ते 5 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ या कालावधीत घडली.

त्यानंतर 15 ऑक्टोबर रोजी आरोपी सनी हा पुन्हा फिर्यादी यांच्या दुकानात चोरी करण्यासाठी आला. त्याला फिर्यादी आणि त्यांच्या दुकानातील कामगारांनी रंगेहाथ पकडले. त्यावेळी त्याने फिर्यादी आणि त्यांच्या कामगारांना लोखंडी रॉडने मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.