Dehuroad : पैसे देण्यास विरोध केल्याने तरुणास बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – पैसे देण्यास विरोध केल्याने तिघांनी मिळून एका तरुणाला(Dehuroad) बेदम मारहाण केली. तसेच तरुणाच्या खिशातून सात हजार रुपये रोकड जबरदस्तीने काढून घेतली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. ही घटना 13 ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजता भक्ती शक्ती चौकाजवळ देहूरोडच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात घडली.

युवराज संतोष अडागळे (वय 19, रा. निगडी), रोहन बाळासाहेब सावंत (वय 19, रा. चिखली), मनोज रामा साठे (वय 24, रा. निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी किरण गणपत ओंबाळे (वय 24, रा. निगडी) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Ahamadnagar : अहमदनगर-आष्टी रेल्वेला आग ; रेल्वेचे इंजिन व तीन ते चार डब्यांना लागली आग

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, (Dehuroad) फिर्यादी हे भक्ती शक्ती चौकाजवळ देहूरोडच्या बाजूला असलेल्या मोकळ्या मैदानात थांबले असताना आरोपी दुचाकीवरून तिथे आले. त्यांनी फिर्यादी यांना कुठे रहातो, असे विचारले. फिर्यादी यांनी पत्ता सांगितला असता आरोपींनी फिर्यादीकडे पैशांची मागणी केली. त्यासाठी फिर्यादीने नकार दिला.

त्यानंतर याला जास्त घमंडी आहे, असे म्हणत तिघांनी फिर्यादीस शिवीगाळ करून मारहाण केली. एकाने लोखंडी रॉडने फिर्यादीच्या तोंडावर, पाठीवर, शरीरावर ठिकठिकाणी मारून जखमी केले. त्यानंतर आरोपींनी फिर्यादी यांच्या खिशातून सात हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.