Talegaon Dabhade : विचारांची प्रगल्भता केवळ वाचनामुळेच – प्रभाकर ओव्हाळ 

माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा

एमपीसी न्यूज – दैनंदिन जगण्यात विचारांची प्रगल्भता केवळ वाचनातूनच प्राप्त (Talegaon Dabhade ) होते. आज तंत्रज्ञानाच्या परमोच्च आविष्काराच्या युगात ही वाचन संस्कृती विचारांचे भान देत जगण्याचा ताण कमी करत मानवी जगण्यात समतोल साधण्याचे मोठे काम करत असल्याचे मत साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ यांनी व्यक्त केले.

माजी राष्ट्रपती डॉ अब्दुल कलाम यांच्या जन्म दिनानिमित्त इंद्रायणी महाविद्यालयात मराठी विभागाच्या वतीने आयोजित वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ओव्हाळ बोलत होते.

Pimpri : आम्ही या एरियाचे भाई आहोत असे म्हणत तरुणावर कोयत्याने वार

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, मराठी विभागप्रमुख डॉ विजयकुमार खंदारे, डॉ संदीप कांबळे, प्रा सत्यजित खांडगे तसेच विविध विभागाचे विभागप्रमुख, प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डाॅ विजयकुमार खंदारे यांनी केले. त्याप्रसंगी (Talegaon Dabhade ) बोलताना तंत्रज्ञानाच्या आधीन असलेल्या आजच्या पिढीला वाचनाकडे वळविण्यासाठी अशा कार्यक्रमांची आवश्यकता असल्याचे मत डाॅ खंदारे यांनी व्यक्त केले.

आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डाॅ संभाजी मलघे यांनी ख-या श्रीमंतीची व्याख्या पुस्तक आणि विचार असल्याचे मत व्यक्त केले. पुस्तक हे चांगल्या समाजाचे मस्तक असल्याचे सांगत तरूणांनी वाचनातून प्रेरणा घेऊन आपले आयुष्य उभे करावे असा विद्यार्थ्यांना डाॅ मलघे यांनी सल्ला दिला.

डाॅ संदीप कांबळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे आभार व सूत्रसंचालन प्रा सत्यजित खांडगे  (Talegaon Dabhade ) यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.