Mahalunge : जिलेबी विक्रेत्यास मारहाण करून 25 हजारांची रोख लुटली

एमपीसी न्यूज – रस्त्याने जाताना काही मुलांना धक्क्बुक्की करणाऱ्यांना (Mahalunge) विचारल्याच्या कारणावरून जिलेबी विक्रेत्याला तिघांनी मारहाण केली. त्यानंतर विक्रेत्याच्या खिशातून 25 हजारांची रोख काढून घेतली. ही घटना 13 ऑक्टोबर रोजी खेड तालुक्यातील खराबवाडी येथे घडली.

Dehuroad : पैसे देण्यास विरोध केल्याने तरुणास बेदम मारहाण

अशोक जगदीश चौधरी (वय 28, रा. निघोजे, ता. खेड. मूळ रा. राजस्थान) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनिकेत उर्फ बबन केसवड, संकेत कड, आकाश राजगुरू (सर्व रा. खराबवाडी, ता. खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे मुलांना धक्काबुक्की करीत होते. त्यामुळे त्याचा फिर्यादी यांनी जाब विचारला. त्यावरून आरोपींनी फिर्यादीस काठी, वीट आणि दगडाने बेदम मारहाण केली.

फिर्यादी यांनी जिलेबी विक्रीची आणि साहित्य खरेदी करण्यासाठी ठेवलेली 25 हजारांची रोख रक्कम आरोपींनी जबरदस्तीने काढून घेतली आणि दुचाकीवरून पळून गेले. महाळुंगे एमआयडीसी पोलीस तपास करीत (Mahalunge) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.