ISRO : भारताचे स्वतःचे स्पेस स्टेशन असेल – इस्त्रो प्रमुख एस सोमनाथ

एमपीसी न्यूज – आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या तोडीचे ( ISRO ) भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक (Space Station) उभारण्यास आगामी काळात प्राधान्य राहील, अशी ग्वाही भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)चे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी दिली. हे अंतराळ स्थानक भारताच्या परवानगीने इतर देशांना देखील वापरता येईल.

नवीन वर्षांत ISRO ने दुसरी मोहीम यशस्वी केली. खगोलीय घटनांच्या माहितीसाठी उपग्रह सोडल्यानंतर लगेच आदित्य – एल 1 आपल्या गंतव्य स्थानावर पोहोचल्याची आनंदवार्ता मिळाली. वर्षाच्या सुरुवातीला दोन मोहिमांना भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला यश आले आहे.

एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत एस सोमनाथ म्हणाले, “चांद्रयान 3च्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला एक दिशा, एक ध्येय दिले आहे. अमृतकाळात आपल्याला काय साध्य करायचे आहे, याची आता तयारी करावी लागेल. चांद्रयान 3 लॅँडर हॉप चाचणी, प्रोपल्शन मोड्यूलला चंद्रावरून पृथ्वीच्या कक्षेत परत आणणे आणि आता आदित्य मिशनला हॅलो ऑर्बिटमध्ये (लॅंग्रेज 1) ठेवणे हे भविष्यातील तयारीचा एक भाग आहे.

Cabinet Decision : मंत्रिमंडळ बैठकीत घेतले नऊ महत्वाचे निर्णय

भारत स्वतःचे स्पेस स्टेशन उभारणार आहे. स्पेस स्टेशनचे डिझाईन पूर्णपणे भारतीय असेल. अवकाशात स्थापित केल्यानंतर ते ऑपरेट करायचे आहे. त्यासह आपल्याला मंगळावर उतरायचे आहे. हे एक अतिशय आव्हानात्मक मिशन आहे. 2040 पर्यंत भारतीय अंतराळवीरांना चंद्रावर पाठवायचे आहे. त्यासाठी तंत्रज्ञान आत्मसात करावे लागेल, असेही सोमनाथ म्हणाले.

अंतराळ संशोधनातील आपली व्याप्ती वाढविण्यासाठी आपल्याला मोहिमांमध्ये नाविन्य आणावे लागेल. नवीन कल्पना आणाव्या लागतील. तंत्रज्ञान जसजसे प्रगत होते तसतसा खर्चही कमी होतात. कृत्रिम बुद्धिमत्ता विकसित होते आणि कार्यक्षमता वाढते. चांद्रयान 3 आणि आदित्य मिशनमध्ये बरेच ऑटोमेशन झाले आहे. रिमोट सेन्सिंग आणि कम्युनिकेशन सॅटेलाईटमध्येही या तांत्रिक सुधारणांचा लाभ मिळेल, असेही सोमनाथ यांनी ( ISRO ) सांगितले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.