Chinchwad : पीसीसीओईचे पारिठेवाडीत श्रम संस्कार शिबिर

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड एज्यूकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड (Chinchwad) तालुका मावळ येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन केले होते. या मध्ये अनेक सामाजिक उपक्रमातून जनजागृती करण्यात आली. सात दिवस झालेल्या या निवासी शिबिरात 60 स्वयंसेवकांनी सहभाग घेतला.भियांत्रिकी महाविद्यालय निगडी (पीसीसीओई) यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत इंगळुन-पारिठेवाडी, 

यामध्ये लोकसंख्या जागरुकतेवर भित्तीचित्रे, ग्रामस्थांमध्ये मतदान जनजागृती, ग्राम स्वच्छता, शाळा डागडुजी, शालेय विद्यार्थ्यांसाठी क्रिडा स्पर्धा दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन, शिवराज्याभिषेक सोहळा, सापाविषयी समज-गैरसमज व विविध विषयांवर व्याख्याने, अंधश्रद्धा निर्मूलन, सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य तपासणी शिबीर, पथनाट्य अशा उपक्रमांचा समावेश होता. येथील शाळेला आवश्यक असणारे संगणक संच आणि क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.

या विशेष श्रम संस्कार शिबिराला पीसीईटीचे विश्वस्त नरेंद्र लांडगे, पीसीसीओईचे संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, विद्यार्थी कल्याण व विकास अधिष्ठाता डॉ. प्रविण काळे यांनी भेटी देऊन विशेष कौतुक केले. शिबिराच्या समारोप प्रसंगी इंगळुन पारिठेवाडी ग्रुप ग्रामपंचायतचे सदस्य तसेच, प्राध्यापक, गावकरी उपस्थित होते. नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी दिनेश कुटे व विद्यार्थी प्रतिनिधी अभिजित बनसोडे यांनी केले.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओई संचालक डॉ. गोविंद कुलकर्णी, विद्यार्थी कल्याण व विकास अधिष्ठाता प्रविण काळे, सामाजिक कार्यकर्ते गोरख भालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले (Chinchwad) होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.