Chandrayaan : प्रज्ञान रोव्हरने क्लिक केला विक्रम लँडरचा फोटो

इस्त्रोनं स्माइल प्लीज असं कॅप्शन देत शेअर केले फोटो

एमपीसी न्यूज – चंद्रावर फिरत असलेल्या प्रज्ञान रोव्हरने काल सकाळी विक्रम ( Chandrayaan ) लँडरचा खास फोटो क्लिक केला. इस्त्रोनं स्माइल प्लीज असं कॅप्शन देत हे फोटो शेअर केले आहेत.  रोव्हरवर असणारा नेव्हिगेशन कॅमेऱ्याने हा फोटो टिपला आहे.लॅबोरेटरी फॉर इलेक्ट्रो-ऑप्टिक्स सिस्टिम्स या ठिकाणी चांद्रयान-3 चे नॅव्हकॅम तयार करण्यात आले आहेत.” असं इस्रोने आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

भारताच मिशन चांद्रयान-3 यशस्वी ठरलं आहे. 23 ऑगस्टला विक्रम लँडरने चंद्रावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग केलं. इस्रोकडून दरदिवशी या मिशनबद्दल नवीन अपडेट दिली जात आहे. काल (दि.30) सकाळी 7:35 वाजेच्या सुमारास प्रज्ञान रोव्हरने विक्रम लँडरचा हा खास  फोटो क्लिक केला आहे. विक्रम लँडरसोबतच या फोटोमध्ये ChaSTE आणि ILSA हे दोन पेलोड देखील दिसत आहेत.

Rakshabandan : राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके आणि भाजप आमदार उमा खापरे यांचे नेदरलँडमध्ये रक्षाबंधन

चांद्रयान-3 मधील विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्रावर सातत्याने संशोधन करतोय. काल चंद्रावर ऑक्सिजन, आयरन, क्रोमियम, टायटेनियम, एल्युमिनियम, कॅल्शियम, मॅगनीज, सिलिकॉन, सल्फर असल्याची पुष्टी केली. आता प्रज्ञान रोव्हर इथे हायड्रोजनचा शोध घेण्याचा प्रयत्न करतोय.

चंद्राच्या तापमानाबद्दल सुद्धा काही महत्त्वाचे खुलासे झाले आहेत. चंद्राच्या पुष्ठभागापासून 10 सेंटीमीटर आत मायनस तापमान आहे. पुष्ठभागावर तेच तापमान 50 डिग्रीपेक्षा जास्त असते. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाबद्दल अजूनपर्यंत या गोष्टी माहित नव्हत्या. विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हरमधील उपकरण अजून काही महत्त्वाचे शोध लावू ( Chandrayaan ) शकतात.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.